अभिनेता करण जोहरच्या पार्टीतला एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वादात सापडला आहे. व्हिडीओत दिसणारे दीपिका, आलिया भट्ट, मलायका, अर्जुन, रणबीर, विकी कौशल, वरुण धवन, शाहिदसह अनेक सेलिब्रिटी हे अमली पदार्थांच्या नशेत होते असा आरोप अकाली दलाचे आमदार मंजिदर सिरसा यांनी केला. या कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करावी अशीही मागणी त्यांनी केली. मंजिदर सिरसा यांनी उघडपणे कलाकारांवर केलेल्या आरोपांमुळे बॉलिवूड पार्टीमध्ये अमली पदार्थांचं सेवन होतं का? हा मुद्दा चर्चेत आला आहे.
'बॉलिवूड पार्टीमध्ये ड्रग्ज घेतले जातात, तुम्ही कोकेनचं सेवन केलं नाही तर तुम्ही कूल नाही असं इथे मानलं जातं. अनेकजण केवळ दिखाव्यासाठी कोकेनचं सेवन करतात, कारण कोकन हे महागड्या अमली पदार्थांपैकी एक आहे, त्यामुळे दिखाव्यासाठीही कलाकार नशा करतात', असा दावा रॅपर हार्ड कौर हिनं आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.
दीपिका, रणबीरसह करणच्या पार्टीतील सर्व कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करा, आमदाराची मागणी
'अभिनेता अभिनेत्री अनेकजण अमली पदार्थांची नशा करतात हे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळतं', असाही दावा हार्ड कौरनं वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. 'बॉलिवूडमधल्या मोठ मोठ्या पार्टीमध्ये सर्रास अमली पदार्थ असतात. अमली पदार्थांशिवाय पार्टी होऊच शकत नाही असा मानणारा एक वर्ग आहे. बॉलिवूडमधल्या एका जोडप्यानं काही वर्षांपूर्वी पार्टी आयोजित केली होती त्यातही विविधप्रकारचे अमली पदार्थ होते. आता हे जोडपं एकमेकांपासून विभक्त झालं आहे. सध्या बॉलिवूड हे कोकेनच्या अंमलाखाली आहे', अशी प्रतिक्रिया टॅलेन्ट मॅनेजमेंट संस्थेच्या एका संस्थापकानं नाव न सांगण्याच्या अटीवर संबधित वृत्तसंस्थेला दिली.
बिग बॉस मराठी २ : शिवची आई म्हणते, विणा तुला बहिणीसारखीच
आमदार मंजिदर सिरसा यांच्या आरोपावर बॉलिवूड कलाकारांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मात्र कलाकारांची बाजू घेतली आहे.