पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉलिवूड कलाकारांनी अरुण जेटली यांना वाहिली श्रध्दांजली

अरुण जेटली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. जेटलींना ९ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जेटली यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांसोबत बॉलिवूड कलाकारांनी देखील श्रध्दांजली वाहिली आहे.

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी अरुण जेटली यांच्या निधनानंतर ट्विट करत त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'अरुण जेटली यांना मी २० वर्षापूर्वी पहिल्यांदा भेटलो होतो आणि तेव्हापासून मी त्यांचा चाहता झालो. त्यांच्या निधनामुळे आपल्या देशाचे मोठे नुकसान झाले आहे.' असे म्हणत अनिल कपूर यांनी अरुण जेटली यांना श्रध्दांजली वाहिली.

ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून अरुण जेटली यांना श्रध्दांजली वाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अरुण जेटली लता मंगेशकर यांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत काढलेला एक फोटो ट्विटरवर पोस्ट करत लता मंगेशकर यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी अरुण जेटली यांच्या निधनानंतर ट्विट करत दु:ख व्यक्त केले. जेटलींच्या निधनाबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करते, असे म्हणत त्यांनी जेटलींना श्रध्दांजली वाहिली.

तर, बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने देखील अरुण जेटली यांच्या निधनानंतर ट्विट करत श्रध्दांजली वाहिली. देशाने आणखी एका महान नेत्याला गमावले, असे म्हणत सनी देओलने दु:ख व्यक्त केले आहे.