पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीत कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

 बॉलिवूड दिवाळी पार्टी

दिवाळी सणाच्या आधी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकार, दिग्दर्शकांच्या घरी रंगणारी बॉलिवूड पार्टी हा  बी टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो.  नुकतीच जॅकी भगनानी आणि मल्लिका भट्ट यांनी बॉलिवूडसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं.

अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांसोबत शाहरूखची दिवाळी

या  दोन पार्ट्यांसाठी बॉलिवूडमधले अनेक कलाकार, जोडपी उपस्थित होती. बॉलिवूडमधलं चर्चेत असणारं जोडपं तर मलायका- अर्जुन यांनी मात्र एकत्र न जाता दोन वेगवेगळ्या पार्टीनां उपस्थिती लावली. अर्जुन निर्माता, अभिनेता जॅकी भगनानीच्या पार्टीत दिसला, तर मलायकानं मात्र तिची खास मैत्रीण मल्लिका भट्टच्या पार्टीत उपस्थित राहण्याचं ठरवलं. 

मलायका अरोरा
अर्जुन कपूर- वरुण धवन

वरुण धवन, वरुण शर्मा, शाहिद मिरानं जॅकी भगनानीच्या पार्टीत उपस्थिती लावली. यावेळी मिरानं आपल्या हटके  दिवाळी ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधलं. 

मिरा राजपूत, शाहिद कपूर, वरुण शर्मा, वरुण धवन

कुणाल खेमू, सारा अली खान, तापसी पन्नू पारंपरिक वेशात पार्टीसाठी उपस्थित होते. 

सारा अली खान, तापसी पन्नू

अभिनेत्री काजोल, सोफी चौधरी, अमृता अरोही पार्टिसाठी उपस्थित होते.

काजोल, सोफी चौधरी
या दोन पार्टीबरोबरच अमिताभ बच्चन यांनीदेखील दिवाळीच्या पहिल्या दिवशी बॉलिवूडकरांसाठी पार्टीचं आयोजन केलं आहे. 

तृतीयपंथीयांच्या बालपणीची गोष्ट सांगणारा 'कोती' पुढील महिन्यांत भेटीला