पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्स ऑफिस टक्कर : २०२० मध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट

बॉलिवूड चित्रपट

बॉलिवूडमध्ये २०२० या वर्षांत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहे. हे चित्रपट सुट्ट्यांच्या दिवशी प्रदर्शित करुन बक्कळ नफा  कमवायचा असं गणित साधरण या चित्रपटसृष्टीचं असतं. मात्र पुढील वर्षांत ही स्पर्धा अत्यंत तीव्र होणार आहे. अजय देवगन, दीपिका पादुकोन, कंगना रणौत, अक्षय कुमार, सलमान खान, आमिर खान  अशा बॉलिवूडमधल्या आघाडींच्या सेलिब्रिटींचे चित्रपट हे २०२० मध्ये प्रदर्शित होत आहेत. यातल्या सर्वच सेलिब्रिटींच्या प्रदर्शनाची तारीख ही सारखीच असल्यानं बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पहायला मिळणार हे नक्की 

'तानाजी' विरुद्ध 'छपाक' 
नवीन वर्षांच्या पहिल्याच महिन्यात अजय देवगनचा 'तानाजी' आणि दीपिकाचा 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तनाजी चित्रपटातून अजय देवगन  तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा उलगडणार आहेत. तर दुसरीकडे 'छपाक' चित्रपट हा असिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित आहे. हे दोन्ही चित्रपट १० जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहेत. 

'स्ट्रीट डान्सर' विरुद्ध 'पंगा'  
कंगना रणौतचा पंगा आणि वरूण धवनचा स्ट्रीट डान्सर  हे दोन्ही चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

'लव्ह आज कल २' विरुद्ध 'मलंग' विरुद्ध 'शुभ मंगल ज्यादा  सावधान' 
हे तिन्ही चित्रपट १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाइन डे दिवशी  प्रदर्शित होत आहे. सारा अली खान, कार्तिक आर्यनच्या 'लव्ह आज कल २' ची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही मात्र हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  तर याच दिवशी सिद्धार्थ मल्होत्राचा 'मलंग' आणि आयुष्मानचा   'शुभ मंगल ज्यादा सावधान' हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. 

'सूर्यवंशी' विरुद्ध 'इन्शाअल्लाह' 
हे दोन्ही चित्रपट ईदला  प्रदर्शित होणार आहे. सलमाननं त्याच्या 'इन्शाअल्लाह'  चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. मात्र  'सूर्यवंशी'च्या प्रदर्शनची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. 

'लाल सिंग चढ्ढा' विरुद्ध लव्ह राजनचा चित्रपट 
आमिर खान ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट 'फॉरेस्ट ग्रम्प'चा हिंदी रिमेक 'लाल सिंग चढ्ढा' प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. हा चित्रपट २०२० ख्रिस्मसमध्ये प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा आहेत. तर अजय देवगन, रणबीर कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक लव्ह राजनचा चित्रपट देखील ख्रिस्मसमध्येच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्यापही ठरलं नाही.