पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सारा अली खानचा फिटनेस फंडा; जिममधील व्हिडिओ व्हायरल

सारा अली खान फिटोनेस फंडा

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील चाहत्यांचे मन जिंकले आहे. सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. सारा फिटनेसला खूप प्राधन्य देत असून याबाबत ती नेहमी चर्चेत असते. जिममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.

'बाला' चित्रपटाची धमाकेदार कमाई; ५० कोटींचा आकडा पार

नुकताच, साराने वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा फिटनेससाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. तसंच तिची फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहित तिला फिटनेसचे धडे देताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट करत साराने त्यावर 'मंडे मोटिवेशन' असे म्हटले आहे.

'दबंग ३' मधून राहत फतेह अली खान यांची दोन गाणी वगळली

दरम्यान, सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 'सिंबा' चित्रपटामध्ये तिने काम केले होते. या दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. त्याचसोबत प्रेक्षकांनी देखील साराच्या कामाचे कौतुक केले होते. सारा अली खान लवकरच 'लव आजकल २' आणि 'कुल नंबर १' चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'लव आजकल २' चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत तर 'कुली नंबर १' मध्ये ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. 

मुलींच्या विश्वात नेणाऱ्या बहुचर्चित 'गर्ल्स'चा ट्रेलर लाँच