पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिका आणि प्रियंकाचे इन्स्टाग्रामवर आहेत इतके फेक फॉलोअर्स

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्री आहेत. या दोघी इन्स्टाग्रामवर पहिल्या १० सेलिब्रिटिजच्या यादीमध्ये आहेत. ज्याचे या सोशल मीडिया साइट्सवर सर्वात जास्त फेक फॉलोअर्स आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ कंटेंपररी म्यूजिक परफॉर्मेंस (आयसीएमपी) ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या दीपिका पदुकोणचे ४८ टक्के फेक फॉलोअर्स आहेत. तर १० व्या क्रमांकावर असलेल्या प्रियांका चोप्राचे ४६ टक्के फेक फॉलोअर्स आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

keep your face to the sun and you will never see the shadows...💫

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

'बॉडी शेमिंग'वर अभिनेत्री नित्या मेननने मांडले परखड मत

दीपिका पदुकोणच्या इन्स्टाग्रामवर सध्या ३.७९ कोटी फॉलोअर्स आहेत. तर प्रियांका चोप्राच्या इन्स्टाग्रामवर ४.३६ कोटी फॉलोअर्स आहेत. आयसीएमपीने सांगितले की, 'आम्ही सर्वात जास्त यशस्वी आणि सर्वात जास्त फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटिजच्या नावाची यादी तयार करतो. यामध्ये अभिनय, क्रीडा, संगीत यामधील अनेक व्यक्ती असतात. सुरुवातीला आम्ही यामधील सर्वात जास्त फॉलोअर्स असलेल्या व्यक्तींची नावं बाजूला काढली. त्यानंतर आम्ही सर्वात जास्त फॉलोअर्स असलेल्या १०० लोकांची यादी तयार केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Cannes 2019 @red #5BFilm

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

अमोल कोल्हे निर्मित मालिकांचे एका दिवसाचे मानधन पूरग्रस्तांना देणार

त्यांनी पुढे असे सांगितले की, 'त्यानंतर आम्ही त्यांच्या इन्स्टाग्राम आणि टि्वटर हँडलला आयईडी ऑडिट आणि स्पार्कटोरोच्या फेक टि्वटर फॉलोअर्स टूलच्या मदतीने वास्तविक फॉलोअर्सची माहिती जाणून घेतली.' दरम्यान, प्रियांका चोप्रा तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी २७१,००० डॉलर कमावते. तर विराट कोहली एका पोस्टसाठी १९६,००० डॉलर कमावतो. 

कलम ३७०: आतिफ असलमची सोशल मीडियावर भारतीयांनी घेतली शाळा