पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुत्र्याला न्याय मिळावा यासाठी बॉलिवूडचे कलाकार आले एकत्र

सोनम कपूर, अनुष्का शर्मा

बॉलिवूडच्या कलाकारांना प्राण्याविषयी किती प्रेम आहे हे आपण नेहमी पाहतो. प्रत्येक कलाकार आपल्या पाळीव प्राण्यासोबत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र अशी ही काही लोकं जगात आहेत जे प्राण्यांना वाईट वागणुक देतात, त्यांना मारहाण करतात. नुकताच मुंबईमधून अशीच घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने रस्त्यावरील कुत्र्याला अमानुष मारहाण केली आहे. मारहाण करण्यात आलेल्या कुत्र्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे पाहून अभिनेत्री अनुष्का शर्मा, सोनम कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेता जॉन अब्राहम खूप भडकले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करत राग व्यक्त केला आहे. या कुत्र्याला न्याय मिळावा यासाठी प्राणीप्रेमींपाठोपाठ हे कलाकार देखील पुढे आले आहेत.

'जबरिया जोडी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली

ही घटना अशी आहे की, मुंबईच्या वरळी भागामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. पावसापासून वाचण्यासाठी रस्त्यावरील एक कुत्रा इमारतीच्या आतमध्ये शिरला. त्यामुळे संतप्त झालेल्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या या कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणानंतर अनुष्का शर्माने जखमी कुत्र्याचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असे म्हटले आहे की, 'ही घटना अमानविय आणि अविश्वसनीय आहे. हीच वेळ आहे सर्वांसाठी मदतीसाठी पुढे येण्याची. या कुत्र्याला न्याय मिळवून देण्याची गरज आहे. मारहाणीमुळे हा कुत्रा स्वत:च्या पायावर उभा देखील राहत नाही.

...अन सलमान खानने दिला कपिल शर्माला 'हा' सल्ला

अभिनेत्री सोनम कपूरने देखील इन्स्टाग्रामवर कुत्र्याचा फोटो पोस्ट करत असे म्हटले आहे की, 'ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्याच्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. हा गुन्हा असून त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे.' दरम्यान, जॅकलिन फर्नांडिसने देखील इस्टावर फोटो पोस्ट करत लोकांना आवाहन केले आहे. अभिनेता जॉन अब्राहमचे देखील हेच म्हणणे आहे.

अर्जुन कपूरच्या विरोधात धोनी खेळला फूटबॉल सामना