पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तोंड झाकून दहशतवादी येतात, देशभक्त नाही: सुशांत सिंह

अभिनेता सुशांत सिंह

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा देशभरातून निषेध केला जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह यांने यासंर्भात ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे. सुशांत सिंहचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे अनेक विद्यार्थी संघटना आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सुशांत सिंह सहभागी झाला होता.

 

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न सुरु: सोनिया गांधी

सुशांत सिंहने ट्विट करत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्याने ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'रस्त्यांवरील दिवे आणि इंटरनेट बंद करुन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करुन आणि तोंड लपवून चोर आणि दहशतवादी येतात, देशभक्त नाही.' दरम्यान, सुशांत सिंहचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'ज्ञानेश्वर विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा मला कमीपणा नाही'

जेएनयू विद्यापीठात रविवारी तोंडाला रुमाल बांधून आणि हातामध्ये काठ्या घेऊन काही अज्ञात घुसले. त्यांनी वस्तिगृहात घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. जवळपास ५० हून अधिक अज्ञात कँम्पसमध्ये घुसल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांनी कँम्पसमधील गाड्यांची देखील तोडफोड केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जेएनयूचे १८ विद्यार्थी जखमी झाले होते. उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहे. 

दिल्लीत या तारखेला होणार मतदान, 'व्हॅलेंटाइन डे'पूर्वीच