पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेंग्यू, उपचार सुरू

सुशांत सिंग राजपूत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेंग्यूचं निदान झालं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुशांत  या आठवड्यात अबुधाबीच्या दौऱ्यावर होता. मात्र त्यानं आपला दौरा रद्द केला असून डॉक्टरांनी त्याला सक्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिरसोबत शाहरुख- सलमानही?

गेल्या काही दिवसांपासून सुशांतची तब्येत ठिक नव्हती. चाचणी केल्यानंतर त्याला डेंग्यूचं निदान झालं.  एका कार्यक्रमासाठी तो  या आठवड्यात अबुधाबीला जाणार होता, मात्र त्याला हा कार्यक्रम रद्द करावा लागला अशी माहिती मुंबई मिररनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. 

आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' डिसेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये होणार प्रदर्शित

सुशांत काही दिवसांपासून युरोपमध्ये होता तो नुकताच मुंबईत परतला होता.  'छिछोरे' चित्रपटात दिसलेला सुशांत लवकरच एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. प्रसिद्ध कांदबरी 'फॉल्ट इन अवर स्टार्स'वर हा चित्रपट आधारलेला आहे.