पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: शाहरुख खानने फोडली दहीहंडी

शाहरुख खान

श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजे जन्माष्टमी संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मुंबईमध्ये सगळीकडे दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. ठिकठिकाणि गोविंदा पथक उंच-उंच थर लावून हंडी फोडत आहे. अशामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटिंमध्ये देखील दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. बॉलिबूड अभिनेता शाहरुख खानने जन्माष्टमी साजरी केली आहे. शाहरुखने दहीहंडी फोडून आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. दहीहंडी फोडतानाचा त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#happyjanmashtami 🙏 #shahrukhkhan breaks dahi handi on this occasion @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आयुष्मानचा 'अंधाधुन' चित्रपट दक्षिण कोरियात होणार प्रदर्शित

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फुल, फळ आणि फुग्यांच्या सहाय्याने दहीहंडी सजवण्यात आली आहे.  अभिनेता शाहरुख खान आपल्या बॉडीगार्डच्या खांद्यावर बसून हंडी फोडत आहे. शाहरुखने दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. शाखरुखचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला खूप लाईक्स मिळत आहेत.  

बॉलिवूड कलाकारांनी अरुण जेटली यांना वाहिली श्रध्दांजली

शाहरुख खान प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. त्याचे लग्न गौरीसोबत झाले आहे. त्याच्या घरामध्ये ईद ज्या पध्दतीने साजरी केली जाते. तेवढ्याच आनंदात दिवाळी देखील साजरी केली जाते. सध्या शाहरुख खान त्यांच्या आगामी वेब सीरीजमध्ये खूप व्यग्र आहे. 

 

प्रभासच्या 'साहो'नं प्रदर्शनापूर्वीच आंध्र आणि तेलंगणामधून कमावले १२५ कोटी