पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: शाहरुख खानने नागरिकांना प्राण्यांना मदत करण्याचे केले आवाहन

शाहरुख  खान

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने लॉकडाऊन दरम्यान प्राण्यांना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोरोना विषाणूमुळे फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही त्रास होत आहे. या प्राण्यांमुळे कोरोना विषाणू पसरु नये यासाठी नागरिक त्यांच्याजवळ जात नाही. तसेच त्यांना रस्त्यावर सोडून देत आहेत. 

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या धारावीसाठी प्राजक्ताची भावनिक पोस्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीनवर लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे रस्त्यावरच राहणाऱ्या भटक्या प्राण्यांना उपाशी रहावे लागत आहे. नागरिकच घराबाहेर पडत नसल्यामुळे या प्राण्यांना अन्न आणि पाणी मिळत नाहीये. या प्राण्यांसाठी भावूक होत शाहरुख खानने ट्विट करत नागरिकांना त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. 'आपण या प्राण्यांना भरपूर प्रेम देऊ या आणि त्यांची देखभाल करु या, असे आवाहन त्याने आपल्या फॅन्सला केले आहे. 

कॅन्सरमधून बचावलेल्या रवी जाधवच्या मुलाला वाढदिवशी मिळाली खास भेट

दरम्यान, कोरोनाविरोधील लढाईसाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने केंद्र सरकारसह राज्य सरकारला आर्थिक मदत दिली. त्याने क्वारंटाईनसाठी आपल्या कार्यालयाची चार मजली इमारत देण्याचा निर्णय घेतला. त्याचसोबत हेल्थ केअर वर्कर्सच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी ५० हजार पीपीई उपलब्ध करुन देणार आहे. तसंच मुंबईतील साडेपाच हजार कुटुंबीयांना जेवण आणि साडेपाच हजार कुटुंबीयांना एका महिन्यासाठी अन्न पुरवणार आहे. 

सचिनसोबत क्रिकेट खेळणाऱ्या रणबीरचा फोटो पाहिलात का?