बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आगामी 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यग्र आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अशामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आपल्या बॉलिवूडच्या सुलतानाने एक युक्ती लढवली.
विक्रम लँडर चंद्रावर उतरलेला असू शकतो, इस्रोच्या माजी प्रमुखांचे मत
सलमान खान दबंग ३ चित्रपटाच्या सेटपर्यंत चक्क सायकलवरुन पोहचला. याचा व्हिडीओ सलमान खानने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून सलमानच्या चाहत्यांनी त्याला खूप पसंती दिली आहे. सलमान खान फिटनेसला नेहमी प्राधान्य देतो. फिटनेससाठी तो काहीही करतो हे सर्वांना माहिती आहे. अशामध्ये सलमान खानची सेटवर सायकलवर एन्ट्री पाहून सर्व आश्चर्यचकित झाले.
शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि प्रवास दोन्ही अभिनंदनीय - नरेंद्र मोदी
सलमान खानने इन्स्टावर व्हिडीओ शेअर करत त्याला असे कॅप्शन दिले आहे की, 'पावसामध्ये मुंबई शहर असे दिसते. 'दबंग ३' चे शूटिंग पूर्ण करण्यासाठी घरातून निघालो आहे.' सलमानला सायकल चालवताना पाहून त्याच्या चाहत्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी सलमानला रस्त्यामध्ये थांबवून त्याच्यासोबत सेल्फी काढल्याचे व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. दरम्यान, दबंग ३ चित्रपटामध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे.
शास्त्रज्ञांच्या पाठीवर सगळ्यांकडून कौतुकाची थाप, मायावती म्हणाल्या...