पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉलिवूडच्या 'सुलतान'ला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी

सलमान खान

बॉलिवूडचा 'सुलतान' सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. काळवीट शिकार प्रकरणी त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुकवरुन एका तरुणाने सलमानला ही धमकी दिली असून ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पोलिस यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे.  

काश्मिरच्या मुद्दयावर कोणीच साथ देत नसल्याने इम्रान खान निराश

सलमान खानला याआधी पंजाब-हरियाणातील कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता याच गँगशी जोडलेल्या 'सोपू' संघटनेच्या 
फेसबुक पेजवरुन गॅरी शूटर नावाच्या एका तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या तरुणाने सलमानचा फोटो टाकत त्याला लाल रंगाने क्रॉस मार्क केले आहे. तसंच, 'विचार कर सलमान तू भारताच्या कायद्यातून वाचू शकतो. मात्र बिश्नोई समाज आणि सोपू संघटनाच्या कायद्याने तुला मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. सोपू न्यायालयात तू दोषी आहे' असे त्याने पोस्टमध्ये  लिहिले आहे. 

ग्वाल्हेरजवळ मिग २१ विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जोधपूर पोलिस सतर्क झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 'तपास करत असताना जर आम्हाला काही तथ्य आढळले तर आम्ही सुरक्षा व्यवस्थेत वाढू करु', अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, काळवीट शिकार प्रकरणी येत्या २७ सप्टेंबरला सलमान खानला जोधपूर न्यायालयात हजर व्हायचे आहे.  सलमान खान न्यायालयात हजर राहिला नाही तर त्याचा जामीन रद्द होणार आहे. सलमानला न्यायालयाने ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. 

'वंचित', 'आप'कडून करवीरमधून एकाच व्यक्तीला उमेदवारी