पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल

ऋषी कपूर

प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे भाऊ आणि दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, 'ऋषी कपूर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.' 

माझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता

रणधीर कपूर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की,  'ऋषी कपूर कर्करोगाने ग्रस्त आहे. सध्या त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.' यावेळी रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर यांच्यावर व्हेंटिलेटवर उपचार सुरु असल्याचे वृत्त फेटाळून लावला आहे. तसंत, ते लवकर बरे होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

चित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरम्यान, ऋषी कपूर २०१८ साली कर्करोगावरील उपचारासाठी अमेरिकेत गेले होते. त्याठिकाणी ११ महिने त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ते मुंबईत परतले. मात्र बुधवारी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी देखील फेब्रुवारी महिन्यात त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

इरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली