पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार

बॉलिवूड अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर

२४ तासांत बॉलिवू़डने दोन दिग्गज कलाकारांना गमावले आहे. बुधवारी अभिनेते इरफान खानच्या निधनामुळे बॉलिवूड कलाकारांसह चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अशात गुरुवारी सकाळी त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. ऋषी कपूर यांचा कर्करोगाशी गेली दोन वर्षे  दिलेला लढा अपयशी ठरला आहे.  ॉ

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

कर्करोगामुळे बॉलिवूडला इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दिग्गज कलाकारांना गमवाने लागले आहे. बुधवारी प्रकृती खालावल्यामुळे ऋषी कपूर यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व जण ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत होते. अशातच त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसला आहे. ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ वर्षी निधन झाले. २०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.

माझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता

याआधी बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचे बुधवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते ५४ वर्षांच होते. २०१८ मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची कर्करोगाशी झुंज अखेर संपली. मंगळवारी श्वसनाला त्रास होत असल्यामुळे इरफान खान यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. दुर्देवाने इरफान खान यांच्या मृत्यूपूर्वी चार दिवसांआधी त्यांच्या आईचेही आजाराने निधन झाले होते. 

चित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे