बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केल्यानंतर आता राजकुमार राव त्याच्या आगामी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार राव 'लूडो' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपट राजकुमार राव अभिनेता अभिषेक बच्चनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुराग बासू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
... आणि आलियाने कपूर कुटुंबियांसोबत केले नववर्षाचे स्वागत
आज नववर्षाच्या निमित्ताने राजकुमार रावने आपल्या चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. राजकुमार रावने लूडो चित्रपटातील त्याच्या फर्स्ट लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. राजकुमार रावच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. या फोटोमध्ये राजकुमार रावने महिलांची वेशभूषा केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला या लूकमध्ये ओळखणे कठीण झाले आहे. राजकुमार रावचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.