पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फाळके पुरस्काराच्या घोषणेनंतर महानायकाने 'असे' मानले आभार

अमिताभ बच्चन

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी महानायक अमिताभ बच्चन हे एक आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक खूप वाट पाहत असतात. अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनय आणि त्यांच्या योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अमिताभ बच्चन यांना २०१८ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहे.

बॉलिवूडच्या 'सुलतान'ला पुन्हा मिळाली जीवे मारण्याची धमकी

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहे. त्यांनी हात जोडलेला एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी असे म्हटले आहे की, 'माझ्याकडे शब्द नाहीत, मी कृतज्ञ आहे, परिपूर्ण, आभार आणि धन्यवाद… मी फक्त एक विनयपूर्ण, विनम्र अमिताभ बच्चन आहे.' असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहे. सोशल मीडियावर बॉलिवूड-राजकीय सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे. 

'मारुती'च्या निवडक गाड्या स्वस्त, पाहा किंमती किती कमी झाल्या

अमिताभ बच्चन काही दिवसांपूर्वी बदला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांना 'अग्निपथ', 'ब्लॅक', 'पा' आणि 'पीकू' या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चारवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. १९६९ साली त्यांनी 'सात हिंदुस्थानी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

ग्वाल्हेरजवळ मिग २१ विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bollywood actor amitabh bachchan given reaction to announcement of dadasaheb phalke award