पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG: अलौकिक, अद्भुत अमिताभ

अमिताभ बच्चन यांची पूरग्रस्तांना मदत

अमिताभ श्रीवास्तव अर्थात अमिताभ बच्चन हे नावच पुरेसं आहे. खर तर हरिवंशराय बच्चन यांना अमितजींच “इन्कलाब” हे नाव ठेवायचं मनात होतं. पण कवियित्री सुमित्रा नंदन पंत यांच्या सांगण्यानुसार त्यांनी “अमिताभ” हे नाव ठरवलं. “अमिताभ” अर्थात न-संपणारी बुद्धिमत्ता (अलौकिक). आई तेजी बच्चन यांना अभिनयाची आवड होती. पण घरगुती जबाबदारीमुळे त्यांना अभिनयात करिअर करता आले नाही. पण अमितजींनी अभिनयात करिअर करायचे ठरविले आणि ते यात यशस्वी झाले. 

BLOG: मी आशावादी !

सुरुवातीच्या काळात मॉडेलिंगसाठी लागणारे फोटोज त्यांच्या लहान भावाने त्यांच्यासाठी काढले. कंपन्या त्यांना जाहिरातीसाठी आवाज द्या म्हणत आणि मोबदला म्हणून पन्नास रुपये देत असतं. अशा या अमितजींसाठी आज चित्रपट निर्माता सर्वात जास्त फीज मोजायला तयार असतो. १९७३ ते १९८४ या काळात अमितजींच्या १९ चित्रपटांनी सुवर्ण महोत्सव साजरा केला. ही एक अविश्वसनीय बाब आहे. पण बॉलीवूड मधील एक सत्य आहे. “रिश्ते में तो हम तुम्हारे” म्हणत पडद्यावर दीन-दुबळ्यांची सेवा करणारा शेहंशाह (वास्तवात देखील समाजाप्रती योगदान देताना आपण पाहतो) असो की “जावो पेहले उस आदमी का साईन लेके आओ” म्हणणारा विजय (अमितजींनी जवळपास २० चित्रपटात “विजय” हे नाव धारण केले आहे) असेल अनेक रूपं अनेक अवतार अमितजींनी पडद्यावर साकारले आहेत. 

BLOG : ब्राह्मण म्हणून कोण विचारतो?

सगळी पात्र अगदी आपल्या समोर जिवंत केली आहेत. एखाद्या भावनिक सीनमध्ये हातानी चेहरा झाकून रडणाऱ्या नायकांमध्ये अमितजी मला एकमेव दिसतात ज्यांनी कधीच चेहरा झाकला नाही, भावनिक दृश्य अगदी परफेक्ट साकारली. मग तो शराबी मधील विकी असेल जो मुनीमजी त्याला सोडून गेल्यावर त्याच्या भावना पडद्यावर साकारतो. अथवा दिवारमधील विजय असेल जो त्याच्या शेवटच्या क्षणी आईच्या कुशीत प्राण सोडतो. सगळं कस अप्रतिम! अलौकिक !! आज या अप्रतिम, अद्भुत  कलाकाराचा, महानायकाचा ७७ वा वाढदिवस. या वयात देखील प्रचंड व्यग्र, क्रियाशील, फुल ऑफ एनर्जी असणारे अमितजी, तुम्हास खूप खूप शुभेच्छा !!

BLOG: खेड्याकडे परत चला

ज्या अमितजींना 'रेश्मा और शेरा' या चित्रपटातील मूक अभिनयासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्व. नर्गिस यांच्याशी पत्र व्यवहार केला होता. त्या आधारे स्व. सुनिल दत्त यांनी ही मूक भूमिका अमितजींना दिली. अशा कलाकाराने या चित्रसृष्टीवर राज्य करावं !! अगदी अद्भुत !! हिंदी चित्रपट सृष्टीत सर्वात जास्त दुहेरी भूमिका करण्याचा मान अमितजींना आहे हे विशेष आणि यात महत्वाची बाब म्हणजे महान या चित्रपटात त्यांची तिहेरी भूमिका !!! हि गोष्ट वेगळी कि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. 

BLOG: कायदा सोडून बोला- ही मानसिकता होत आहे का?

अमितजींच्या आवाजास आकाशवाणीने नाकारलं त्याच आवाजाचं गारुड आज जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आहे. विविध चित्रपटात त्यांचा आवाज निवेदक स्वरुपात आपण ऐकला. यात १९६९ मध्ये आलेला “भुवन सोम” असेल, १९७७ साली आलेला ‘सत्यजित रे’ निर्देशित “शतरंज के खिलाडी” असेल वा २००१ साली ‘आमीर खान’ अभिनित “लगान” असेल सगळीकडे अमितजींच्या आवाजाच्या जादूने रसिकांची मने जिंकली आहेत. असं म्हणतात की, चित्रपटसृष्टीत कथा देखील अमितजींकडे पाहूनच लिहिल्या जायच्या, जसे की 'मि. इंडिया'ची कथा लेखक सलीम-जावेद यांनी अमितजीना समोर ठेवून लिहिली होती.

BLOG : ही युती (जागेवरून) तुटायची नाय!

वयाच्या ७७ व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह तरुण पिढीला लाजवणारा आहे. व्यक्त होण्याचं कसब, शब्द संचय, संवाद कौशल्य, कृतीतून व्यक्त होणारी नम्रता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आई-वडिलांवर असणारी श्रद्धा, कुटुंबावर असणारे त्यांचे प्रेम या सर्व बाबी शिकण्यासारख्या आहेत. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून स्वच्छ भारत अभियानात त्यांचा सहभाग देखील अनेक स्वयंसेवकांना प्रेरणा देणारा आहे. एक अभिनेता म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक कर्तृत्ववान मुलगा म्हणून त्यांचे जीवन हे एक प्रेरणास्त्रोतच वाटतं मला. आज त्यांचा वाढदिवस म्हणून हा लेख प्रपंच, अमितजी, तुम्हास खूप खूप शुभेच्छा !!

BLOG: बा सरकार, हे वागणं बरं न्हाई !

- अमित बाळकृष्ण कामतकर 
 सोलापूर 
 kamatkar.amit@gmail.com