पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉबी म्हणतो, मुलाला अभ्यासात अधिक रस याचा अभिमान

बॉबी आणि आर्यमन देओल

देओल कुटुंब हे बॉलिवूडमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे. आता या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. धर्मेंद्र यांच्यानंतर त्यांची दोन मुलं बॉबी आणि  सनी देओलनं चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावून पाहिलं. नुकतंच सनी  देओल यांचा मुलगा करणनंही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र आता बॉबी देओलचा मुलगा आर्यमन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही याचं कुतूहल अनेकांना आहे. मात्र माझ्या मुलाला अभ्यासात अधिक रस आहे, तो शिकत आहे आणि याचा  मला अभिमान असल्याचं बॉबी म्हणाला. 

अनाथ मुलांसाठी सौरउर्जा प्रकल्प, उद्धाटनासाठी सई मांजरेकर फलटणमध्ये

'माझा मुलगा सध्या मॅनेजमेंट शिकत आहे. त्याचा अभ्यासाकडे अधिक कल आहे. माझ्या मुलाची अभ्यासाप्रती आवड पाहून मला अभिमान वाटतो. कोणत्या क्षेत्रात करिअर घडवावं हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. त्यालाही अभिनेता होण्याची इच्छा असेल याची मला खात्री आहे.  तो केवळ १८ वर्षांचा आहे, त्याचं जे स्वप्न आहे ते तो नक्की पूर्ण करेल' अस बॉबी देओल म्हणाला. 

बिग बॉस १३ चं चित्रीकरण लांबणार, सलमानला मिळणार सर्वाधिक मानधन

चित्रपटसृष्टीपासून काही काळ लांब असलेल्या बॉबी देओलनं रेस ३ मधून पुनरागमन केलं.  नुकताच बॉबी तो हाऊसफुल ४ मध्येही दिसला.