पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: नाटकाला दिवाणखान्याबाहेर आणणारा बंडखोर कलाकार

संतोष पवार (छायाचित्रः फेसबुक)

एका नाटकवेड्याने "मीच तो मीच तो" म्हणत रंगमंचावर प्रवेश करत, पुढे दोन अडीच तास धुमाकूळ घालत, हास्याचे फवारे निर्माण करणारी पात्रयोजना करुन, "यदा कदाचित" नाटक उभं केलं आणि रसिकांना हसवून हसवून अक्षरश: आडवं केलं. कित्येक वर्ष, नाटकाचा मखमखली पडदा उघडला की आपल्याला समोर एक दिवाणखाना, डाव्या-उजव्या बाजुला वर जायचा जीना, दोन तीन दारं, सोफा, टिपॉय, टेबल असंच दृष्य दिसत असे. पण ती परंपरा मोडत नाटकाला दिवाणखान्याच्या चौकटी बाहेर आणून, नाटक लोकप्रिय करणारा तो नाटकवेडा म्हणजे धडाडीचा, तरुण बंडखोर, लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार. 

Happy Birthday: आवाजाचा जादूगार, जबरदस्त प्रतिभेचा अभिनेता

शाहिर साबळे यांच्या लोकधारेतून पुढे आलेल्या या वल्लीने आपली घोडदौड यदा कदाचित पासून चालू केली. आणि जाणून बुजून, आम्ही सारे लेकुरवाळे, , जळुबाई हळू, युगे युगे कली युगे, राधा ही कावरी बावरी, लगे रहो राजाभाई, बाजीराव मस्त मी, माझे पती छत्रीपती, यंदा कदाचित, यदा कदाचित रिटर्न्स अशा अनेक हिट नाटकांचं लेखन दिग्दर्शन केलं. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, माझिया भाऊजींना रीत कळेना, आलाय मोठा शहाणा, स्वभावाला औषध नाही, या नाटकांचं दिग्दर्शन आणि तू तू मी मी, राजा नावाचा गुलाम, हवा हवाई, जाऊ बाई जोरात या नाटकांमधे अभिनय केला. 

Happy Birthday : कधी पडद्यावरची खाष्ट सासू, तर कधी प्रेमळ आई

इतकंच नाही तर या अष्टपैलू कलाकाराने काही नाटकाचं गीत लेखनही केलं. नाटकासाठी लागणारा झपाटलेपणा त्याच्याकडे ओतप्रोत भरलेला आहे. म्हणूनच त्याने वेळ पडली तेव्हा प्रयोग रद्द होऊ नये म्हणून स्वत: लेखक दिग्दर्शक असूनही यदा कदाचितमध्ये छोट्या छोट्या भूमिकाही केल्या. नवरा माझा नवसाचा या लोकप्रिय चित्रपटाचे संवाद लेखन त्याने केले. फू बाई फू च्या तिस-या पर्वात किशोरी अंबियेच्या जोडीने त्याने हास्यकल्लोळ केला आणि विजेतेपद पटकावले. या यशस्वीपणे दौडत असलेल्या हास्याच्या वारुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

#नाट्यकर्मीविजू