पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: मराठी रसिकांशी गट्टी करणारा कलाकार

श्रीनिवास भणगे

काकासाहेब धोट्यांच्या घरात त्यांचे पुतणे व्यंकटेश ऊर्फ अप्पासाहेब, पत्नी शांता आणि त्यांचं चालू कार्ट श्याम हे सुखाने (पण एकमेकांना नावे ठेवीत) राहत आहेत. श्याम आपली प्रेयसी दयाला दिलेलं वचन अंमलात आणत नाही. तशातच शांताबार्इंच्या हाती पोस्टाद्वारे आलेलं माया सानेंचं एक पत्र पडतं. पत्र कसलं तर व्यंकटेश धोट्यांना आलेलं प्रेमपत्र आणि पाठोपाठ माया सानेच या घरात येते......मग जो काही गुगली, यॉर्कर, चौकार, षटकार, चोरट्या धावांचा आणि हशे, टाळ्या, शिट्ट्या ह्यांचा ट्वेंटी-ट्वेंटी चा सामना सुरू होतो तो थांबूच नये असं वाटतं. 

Happy Birthday : हसतमुख खलनायक

नाटकाचं नांव एव्हाना लक्षात आलं असलंच....शांतेचं कार्ट चालू आहे...हे नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजलं आणि गाजत रहाणार ह्यात तिळमात्रही शंका नाही. या नाटकाचे लेखक श्रीनिवास भणगे यांचा जन्म २४ डिसेंबर रोजी झाला. मुळातच लेखनाची आवड आणि अंगी असलेला मिष्किलपणा यामुळेच त्यांच्या लेखणीतून अनेक विनोदी एकांकिका आणि विनोदी कथासंग्रह साकार झाले. दोन गुलाबी एक हिरवट, मॅडम, नात्यातून गोत्यात, शेवट नसलेली गोष्ट, सूनमुख. अरे अश्वत्थामा कॉटेज नंबर ५४, आकाशाशी जडले नाते, दंतकथा इ. स. २००२ अशा अनेक नाटकांचं आणि रुम नंबर १०२०, धर्म, दुहेरी, सॅडिस्ट, सिग्नल, हातोहात अशा अनेक एकांकिकांचं लेखन त्यांनी केलं. 'घालीन लोटांगण' म्हणजेच 'शांतेचं कार्ट चालू आहे' या नाटकाने त्यांची मराठी रसिकांशी खरी गट्टी जमली. 

स्मृतिदिन विशेष : 'आनंदयात्री सर्वांना रुखरुख लावून कायमचा निघून गेला'

तुझ्या वाचून करमेना, भूताचा भाऊ, मुंबई ते मॉरिशस, राजू, आरंभ, धरलं तर चावतंय या गाजलेल्या चित्रपटांचं तर, स्वामी, आख्यान, मनोगत, श्री व सौ अब्जबुद्धे, पुणेरी पुणेकर, टण टणा टण या मालिकांचही लेखन त्यांनी केलं. ते फक्त उत्तम लेखकच नाही, तर उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेतेही आहेत. कॉटेज नंबर ५४, आकाशाशी जडले नाते, दोन गुलाबी एक हिरवट, चंद्रमाधवी, घालीन लोटांगण या नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. तर, जैत रे जैत चित्रपटासाठी डॉ. जब्बार पटेल यांना दिग्दर्शन सहाय्य केलं आणि सुगंधा आणि धरलं तर चावतंय या चित्रपटांचं आणि पुणेरी पुणेकर, श्री व सौ अब्जबुद्धे ह्या मालिकांचं दिग्दर्शन त्यांनी स्वत: केलं. दोन गुलाबी एक हिरवट, मॅडम, घालीन लोटांगण, शेवट नसलेली गोष्ट, राहिले दूर घर माझे या नाटकांमधे आपल्या अभिनयाने रसिकांची भरभरून दाद मिळवली. दोस्त माझा मस्त, गोविंदा गोपाळा, वारसा लक्ष्मीचा या चित्रपटांमधे त्यांनी आपला मिष्किलपणा बाजूला ठेऊन खलनायकाची भूमिका केली. तुझ्या वाचून करमेना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद अशी महाराष्ट्र राज्य सरकारची दोन पारितोषिके त्यांनी प्राप्त केली. पहिल्यापासूनच त्यांनी घेतलेलं, रसिकांचं मनोरंजन करण्याचं व्रत अजूनही अव्याहतपणे चालू आहे. अशा या उत्तम, मिष्किल, विनोदी लेखक, अभिनेता, दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
#नाट्यकर्मीविजू

स्मृतिदिन विशेष : ..अचानक नियतीचे फासे उलटे पडले