पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : सर्वोत्तम नाटकांची निर्मिती करणारा धडाडीचा निर्माता

श्रीपाद पद्माकर

नाट्य संस्थेचा व्यस्थापक ते निर्माता असा चढत्या भांजणीचा उल्लेखनीय प्रवास करणारा सच्चा माणूस आणि दिलदार मित्र, "श्रीपाद पद्माकर" यांचा आज वाढदिवस. औरंगाबादमध्ये त्याचा जन्म झाला. एम् कॉमची पदवी घेतल्यानंतर त्याने नाट्य शास्त्राची पदवीही घेतली. शिक्षण झाल्यानंतर तो मुंबई नावाच्या माया नगरीत नशीब अजमावायला आला....आणि त्या नाशिबानेही त्याला पुरेपूर साथ दिली. मेहनत करण्याची तयारी आणि प्रामाणिक स्वभाव यामुळे प्रगतीची एक एक पायरी त्याने सहज ओलांडली. "डॉक्टर तुम्ही सुद्धा" या नाटकाद्वारे त्याने नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं. अश्वमी, चंद्रलेखा अशा अनेक संस्थांतर्फे चाहूल, ऑल द बेस्ट, ध्यानीमनी, सेलिब्रेशन, मनोमिलन, अबोली, गिधाडे, असेच आम्ही सारे, सूर्याची पिल्ले, मी शाहरुख मांजरसुंभेकर, करून गेलो गांव, टॉम अँड जेरी अशा अनेक नाटकांना त्याचा निर्मिती सहभाग होता. कधी सूत्रधार तर कधी व्यवस्थापक म्हणून त्याचा या गाजलेल्या नाटकांशी संबंध आला.

तुझ्यात जीव रंगला :सेटवर पूजा करून केला १००० भागांच्या यशाचा आनंद

त्यानंतर...... जाऊ दे ना बच्चन साहेबांनी सुरुवातीला काय स्ट्रगल केला, हे आठवत बसण्यापेक्षा ते आत्ता काय आहेत याचे गोडवे गाणं चांगलं, तसंच श्रीपादने आधी काय स्ट्रगल केलं हे आठवण्या पेक्षा, त्याचं आत्ता मुंबईतल्या "जिगिषा" या नावलौकिक प्राप्त नाट्य संस्थेतर्फे येणाऱ्या नाटकांना निर्माता म्हणून नाव लागतं, हे अभिमानानं सांगणं जास्त श्रेयस्कर वाटतं. "गेट वेल सून" या नाटकाद्वारे त्याने निर्माता म्हणून पदार्पण केलं आणि पुढे "उत्तम नाटकांचा निर्माता" म्हणून नावारूपाला आला. "अष्टविनायक" या अजून एका प्रतिथयश नाट्यसंस्थेबरोबर त्याने, हसवा फसवी, वाडा चिरेबंदी, व्हॅक्युम क्लिनर, हॅम्लेट, सुरक्षित अंतर ठेवा अशी अनेक उत्तमोत्तम नाटके रसिकांसमोर आणली.

अभिनेत्री उषा जाधवनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार

कलाकारांबरोबर मित्रा सारखा रमणारा, सेटची गाडी उशिरा आली तर सेट लावायला पुढे होणारा, टेपऱ्या आला नाही, तर टेप वाजवायला तयार असणारा हा निर्माता विरळाच. "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" हे त्याचं आगामी नाटकही रसिकांचे मनसोक्त मनोरंजन करणार यात तिळमात्रही शंका नाही. रसिकांचं उत्तम पद्धतीने मनोरंजन करण्याची कास धरून सर्वोत्तम नाटकांची निर्मिती करणाऱ्या या धडाडीच्या निर्मात्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...