पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : हसतमुख खलनायक

शेखर फडके

"कसं काय मंडळी सगळं रमपम रमपम पोश ना?" हसतमुख खलनायक भिकूमामा. त्याला बघून कधी कधी चिड येते, कधी वाईट वाटतं, तर कधी कधी चक्क हसू फुटतं. हे पात्र रंगवणारा सर्वांचा लाडका शेखर फडके. याचा आज वाढदिवस. लहानपणापासूनच त्याला दोन गोष्टींची भारी आवड एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरं म्हणजे अभिनय. गणेशोत्सवात त्याच्या सोसायटीच्या स्टेजवर खणखणीत आवाजात आणि स्पष्ट शब्दोच्चारात श्लोक तोंडपाठ म्हणायचा. 

दबंग ३ : रविवारी तुफान कमाई अन् सोमवारी कमालीची घट

पाठांतराची सवय तेव्हापासूनची. सोसायटीच्या नाटकांमधे तर तो धमाल उडवून द्यायचा. सगळा प्रेक्षकवर्ग त्याच्यावर जाम खुष असायचा. वयाच्या सातव्या वर्षी "मला आई पाहिजे" या चित्रपटातून त्याने चंदेरी दुनियेत पदार्पण केलं. कॉलेजमधे गेल्यानंतर एकांकिका स्पर्धा गाजवून व्यावसायिक नाटकांमधे तो काम करु लागला. तो मी नव्हेच, घर श्रीमंताचं, स्माईल प्लिज, एका लग्नाची गोष्ट, वन टू का फोर, क्रॉस कनेक्शन, बुढा होगा तेरा बाप, गोष्ट तुझी माझी, जादू तेरी नजर, लेले विरुद्ध लेले, जो भी होगा देखा जायेगा, पहिलं पहिलं, पाहुणे आले पळा पळा अशा नाटकांमधे उत्तम अभिनय करुन त्याने रसिकांचे मनसोक्त मनोरंजन केलं.  

'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सई मांजरेकरचा वाढदिवस, आई झाली भावूक

सरस्वती, झोका, दिल्या घरी तू सुखी रहा, वादळवाट, साहेब बीवी आणि मी’, ४०५ आनंदवन, कु कूच कु, तू भेटशी नव्याने, माझिया प्रियाला प्रीत कळेना, पुणेरी मिसळ, फू बाई फू, तू माझा सांगाती, विठू माऊली, नसते उद्योग यांसारख्या अनेक मालिकांमधेही त्याने आपल्या अभिनयाने बहार आणली. तसंच धो धो पावसातील वन डे मॅच, नवरा अवली बायको लवली, निवडुंग, एक अलबेला, ढोलताशे, सूत्रधार, आटली बाटली फुटली, थैमान, शिवामृत, भागमभाग यांसारख्या चित्रपटांमधेही आपल्या अभिनयाने रसिकांची भरभरुन दाद मिळवली. खुल्या दिलाच्या या कलंदर कलाकाराला वाढदिवसाच्या रम पम पोश शुभेच्छा..