पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : एक अचाट वल्ली

सतीश माधव जोशी

व्यावसायिक नाटक, प्रायोगिक नाटक, राज्यनाट्य स्पर्धा, बालनाट्य, मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपट सगळीकडेच मुक्त वावर असलेली एक अचाट वल्ली, म्हणजेच "सतीश माधव जोशी" यांचा आज वाढदिवस. गेली  ४० वर्षे ते या क्षेत्रात अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. एकांकिका स्पर्धांमधून व्यावसायिक नाटकांमध्ये भरारी मारताना त्यांनी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एकांकिकांचं शतक पूर्ण केलं. 

Happy Birthday : मदतीसाठी सदैव तत्पर असलेला 'जगन्मित्र' जमिल

'डोंगर म्हातारा झाला', 'तू फक्त राम म्हण', 'उचलबांगडी', 'शपथ तुला जीवलगा', 'घोळात घोळ', 'मालकीण मालकीण दार उघड', 'पेइंग गेस्ट', 'सौजन्याची ऐशी तैशी', 'वाऱ्यावरची वरात', 'बिघडले स्वर्गाचे दार', 'हसवा फसवी' अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी आपल्या बरोबर असलेल्या दिग्गज सेलिब्रेटींच्या बरोबर  उत्तम अभिनयाने स्वतःचंही असं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. 'दामिनी', 'बंदिनी', 'तिसरा डोळा', 'जगावेगळी', 'काय पाहिलंस माझ्यात', 'गुण्यागोविंदाने', 'नांदा सौख्यभरे', 'लक्ष्य', 'अरे वेड्या मना' अशा मराठी तर, 'वक्त की रफ्तार', 'तेरे घर के सामने', 'श्रीमान श्रीमती', 'येस बॉस', 'बंदिनी' अशा अनेक हिंदी मालिकांमधे त्यांनी आपल्या सकस अभिनयाचा वेगळा ठसा रसिकांच्या मनावर उमटवला.

जयंती विशेष : गायनावर नि:स्सीम प्रेम करणारे थोर गायक

'लपून छपून', 'अण्णागिरी', 'मातृवेणा', 'गोष्ट एका पिंट्याची', 'उबुंटू' अशा काही मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी रसिकांचं दिलखुलास मनोरंजन केलं. इतकंच नाही, तर, 'तिसरा डोळा', 'ऊन पाऊस', 'वाजवा रे वाजवा', 'काय पाहिलंस माझ्यात' अशा अनेक मराठी मालिकांचं दर्जेदार लिखाणही त्यांनी केलं. सध्या गाजत असलेल्या  "कुसूम मनोहर लेले" या नाटकातील मनोहर, कुसूम, भाचा, जोशीकाकू या पात्रांच्या बरोबरीने, सतीश जोशी साकारत असलेले 'जोशीकाका' हे पात्रही रसिकांच्या विशेष पसंतीस पडत आहे ते त्यांच्या उत्कृष्ठ अभिनय, देहबोली आणि सुस्पष्ट संवाद यामुळे. आपल्या शारीरिक व्यंगावरचे विनोदही तितक्याच खिलाडू वृत्तीने स्वीकारून त्याचं मोठ्या हशात रूपांतर होईपर्यंत रिऍक्शन देणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...