पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी रंगचित्रसृष्टीतलं एक वादळी व्यक्तिमत्व

सतीष दुभाषी

"आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयासमोर जोड्यानं मारीन...... " कामगारांचा मसीहा डिकास्टा आणि 'अनर्थमंत्री' दाभाडे यांची गोल्फक्लबमधली ती ऐतिहासिक भेट.... दोन वाघ समोरासमोर बसून एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत एकमेकांना शह काटशह देतायत..... फक्त शब्दांमधून आणि त्याहीपेक्षा मधल्या शांततेमधून हा शाब्दिक बुद्धीबळाचा डाव उभा करणारे ते दोघे..... डॉ. श्रीराम लागू आणि सतीश दुभाषी..... शब्द नुसते बोलण्यासाठी नसतात, ते जाणवून व्यक्त करण्यासाठी असतात, याचा आदर्श नमुना म्हणजे सतीश दुभाषींचं हे एकच वाक्य..... 'सिंहासन' मध्ये मराठीतल्या सगळ्या सुपरस्टार्सची मांदियाळी होती, पण तरीही डिकास्टा आपली पाठ सोडत नाही..... 

बेहद २ : सेटवर अपघात, अभिनेत्याच्या प्रसंगावधानतेमुळे बचावली जेनिफर

सतीश दुभाषी हे मराठी रंगचित्रसृष्टीतलं असंच एक वादळी, व्यक्तिमत्व. त्यांचा रंगभूमीवरचा, चित्रपटातला वावर नेहमीच एखाद्या तुफानासारखा राहिला.. त्यांच्या भूमिकाही तशाच..... 'ती फुलराणी' मधला विसुभाऊंना 'आचार्य' आणि 'च्यायला' यांच्यातल्या 'च्या' मधला फरक समजावणारा विक्षिप्त, सणकी प्रा. अशोक जहागीरदार किंवा शिरवाडकरांचा अजरामर 'नटसम्राट'..... प्रत्येक वेळी स्टेजवर एक नवीन वादळ घोंघावत यायचं आणि अख्खं नाटक घुसळून जायचं..... अंमलदार, सूर राहू दे, धुम्मस, नटसम्राट, शांतता कोर्ट चालू आहे, बेईमान,ती फुलराणी, नेपोलियन, पार्टी, बेकेट..... किती नावं घ्यावीत..... आवाजाचा अप्रतिम वापर, प्रत्येक शब्दांत ओतलेला जीव आणि मधल्या विरामांतही भरलेला प्राण, यांमुळे दुभाषी प्रत्येक भूमिका जिवंत करत जायचे..... आपल्या बेदरकार वादळी अभिनयानं त्यांनी अवघी नाट्यसृष्टी ढवळून टाकली आणि सोज्ज्वळ, कौटुंबिक नाटकांच्या काळात एक रांगडा, आपल्याच मस्तीत गजासारखा वावरणारा नवीन अँग्री यंग मॅन रंगभूमीवर उभा केला. 

बालाकोट एअरस्ट्राइकवर संजय लीला भन्साळी करणार चित्रपटाची निर्मिती

आजही हा झंझावात त्यांच्या अनेक उत्तुंग परफॉर्मन्सेसच्या आणि सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई किंवा चांदोबा चांदोबा भागलास का, या चित्रकृतींमधील अभिनयशैलीच्या रूपानं आपल्यात जिवंत आहे.... सतीश दुभाषी या रंगभूमीवरच्या एका वादळाला मानाचा मुजरा ....