पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : मराठीतला तरुण रफटफ तुर्क

संतोष जुवेकर

हा दिसायला एकदम डॅशिंग, बोलणंही तसं रफटफ.... त्याला मिळालेले रोल्सही तसेच..... रेगे असो किंवा झेंडा..... पण त्या रोल्सची आठवण आली की त्याच्याशिवाय दुसरा कोणी समोर येऊच नये, इतकी त्याची छाप त्या रोल्सवर पडलेली.... सावलीच म्हणा ना..... संतोष जुवेकर हे मराठी चित्रपटातलं एक खणखणीत नाणं..... वाजणार म्हणजे वाजणारच, अशा विश्वासाचं नाणं..... झेंडा मधला एक सीन.... तो आणि सिद्धार्थ चांदेकर त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर भेटलेत..... दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पक्षफुटीमुळे या दोन जिवाच्या दोस्तांचे रस्तेही फुटण्याच्या मार्गावर आहेत..... संतोष जुवेकरच्या अभिनयानं तो सीन आजही मनावर कोरला गेलाय.

Happy Birthday : सर्वाधिक जाहिरातींत झळकलेला मराठमोळा कलाकार

 असे अनेक क्षण, मग ते सिनेमांमधले असोत की मालिकांमधले, या अभिनेत्यानं आपल्या सहज वावरानं खुलवलेत.  आणि मकरंद राजाध्यक्ष या पहिल्याच नाटकात विक्रम गोखलेंसमोर तितक्याच ताकदीनं आणि आत्मविश्वासानं उभं राहून पुढे झेंडा, रेगे, आनंदाचं झाड, पिकनिक, मोरया, आजचा दिवस माझा, आयना का बायना अशा अनेक चित्रपटांत, या गोजिरवण्या घरात, किमयागार, असं सासर सुरेख बाई, ऊन पाऊस, भूमिका अशा दर्जेदार मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारा हा अभिनेता.... मराठी रंगचित्रसृष्टीला आणि टीव्हीजगताला आपल्या अभिनयानं असाच समृद्ध करत राहो, हीच प्रार्थना.... या तरुण रफटफ तुर्काला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा....

Happy Birthday : विनोदाची उत्तम जाण अन् टायमिंगवर कमालीची हुकूमत