पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: रसिकांना मनसोक्त हसवण्याचा वसा घेतलेला कलाकार

अभिनेता सागर कारंडे

"चला हवा येऊ द्या" मधले पोस्टमन काका जेव्हा येतात, तेव्हा ते आज कुणाचं पत्र वाचणार ? ही उत्सुकता असते. कधी ते कोपरखळ्या मारत हसवतात, तर कधी हसवता हसवता डोळ्यांत टचकन पाणी आणतात. त्या पत्रांचं लेखन तर चांगलं असतंच, पण पोस्टमनकाका ज्या उत्कटतेने ते वाचतात ते वाखाणण्यासारखं असतं. या पोस्टमनकाकांचा म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या, "सागर कारंडे"चा आज (१ जानेवारी) वाढदिवस. 

Haapy Birthday: यारों का यार, चालता-बोलता स्टुडिओ

नाशिक इथे त्याचा जन्म झाला. कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या या अतरंगी कलाकाराला लोकांना हसवून त्यांचं मनोरंजन करण्याची खूप आवड. नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, ए. के. हंगल, प्रभाकरपंत पणशीकर, प्राण यांचे आवाज काढून समोरच्याला हसवून हसवून गडाबडा लोळवणे हा त्याचा हातखंडा प्रयोग. या कलेमुळेच २००२ साली त्याने अभिनयाचे धडे गिरवले आणि नंतर मुंबईकडे धाव घेतली. 

स्मृतिदिन : निसर्गदत्त देणगी लाभलेले स्वरमहर्षी छोटा गंधर्व

मुंबईत आल्यावर त्याने झोलबच्चन, खळ खट्याक, यडूकेशन, वस्त्रहरण, जस्ट हलकं फुलकं, सैरावैरा अशा अनेक नाटकांमधे हशांचे चौकार आणि टाळ्यांचे षटकार लगावून रसिकांची मनं जिंकून घेतली. "फु बाई फु" च्या दुसऱ्या पर्वात त्याने सुनील तावडेंबरोबर वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आणि रसिकांना मनसोक्त हसवून अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पण थोडक्यासाठी विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली. नंतर सातव्या पर्वात भारत गणेशपुरे बरोबर त्याने एन्ट्री घेतली आणि हास्याचा धुमधडाका उडवून दिला. रसिकांनी या जोडीला इतकं भरभरून प्रेम दिलं की "फु बाई फु" च्या सातव्या आणि आठव्या पर्वाच्या विजेतेपदाची माळ याच जोडीच्या गळ्यात पडली. 

Happy Birthday: हरहुन्नरी अष्टपैलू अभिनेता

या जोडीने पण रसिकांना तितकंच भरभरून हसायला लावलं. सागरने नंतर रसिकांना टेन्शन विसरायला लावून मनसोक्त हसवण्याचा जणू वसाच घेतला. मालिका, वेबसिरीज, चित्रपट, नाटक सर्व माध्यमातून त्याने रसिकांचं मनोरंजन केलं. चल धरपकड, एक तारा, कुटुंब, कॅरी ऑन देशपांडे, तुझं तू माझं मी चित्रपटातील त्याच्या भूमिका रसिकांच्या अजूनही स्मरणात आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने, "बबन प्रभू पुरस्कार"देऊन त्याचा गौरव केला आणि त्याच्या उत्तम अभिनयाची कौतुकास्पद पावती दिली. "चला हवा येऊ द्या"" मधील तो साकारत असलेली विविध पात्रं रसिकांना अवर्णनीय आनंद देत आहेत. "करून गेलो गाव" आणि "इडियट्स" या नाटकांमधून तो आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांकडून वाहवा मिळवत आहे. अशा या अप्रतिम अभिनेत्याला वाढदिवसाच्या हास्यमय शुभेच्छा... 

जयंती विशेषः दैवी देणगी लाभलेला दिग्गज कलाकार

#नाट्यकर्मीविजू