पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: संधीचं सोनं करणारी गुणी अभिनेत्री

अभिनेत्री रुपाली भोसले (छायाचित्रः फेसबुक)

आपण एखाद्या कलाकाराला मालिकांमध्ये एखादी छोटी भूमिका करताना पाहत असतो. छोट्यामोठ्या भूमिका करणाऱ्या कलाकारांविषयी आपल्याला फारसं काही वाटत नाही. ते फारसे लक्षातही राहत नाहीत. जेव्हा हेच कलाकार हाती आलेल्या संधीचं सोनं करतात आणि आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांना मोहवून टाकतात तेव्हा ते अगदी भरभरून प्रसिद्धी मिळवतात. अशीच ‘बडी दूर से आये है’ या मालिकेद्वारे मिळालेल्या संधीचं सोनं करणारी गुणी अभिनेत्री म्हणजे "रुपाली भोसले" आज तिचा वाढदिवस.

Happy Birthday : मनानं श्रीमंत असलेली अभिनेत्री

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी रुपाली कॉलसेंटरमध्ये काम करत होती. शाळा किंवा कॉलेजमध्ये अभिनयाशी तिचा फारसा संबध आला नाही. अभिनयाच्या क्षेत्रात आली ती नाटय़संमेलनामधून. बीड इथे भरलेल्या नाटय़संमेलनात ती बॅकस्टेजला काम करत होती. या संमेलनात वावरत असताना तीची मराठीतल्या अनेक बडय़ा कलाकारांशी ओळख झाली. त्यानंतर या इंडस्ट्रीशी संबधित छोट्या मोठ्या कार्यक्रमांत तिचा वावर असायचा. त्या दरम्यान ओळखी वाढत गेल्या. अभिनयाच्या क्षेत्रात यायचं असेल तर बॅकस्टेजला काम करण्यापेक्षा नाटकापासून कामाला सुरूवात कर, रंगभूमीचा अनुभव घे आणि मगच छोट्या पडद्यावर काम कर असं तिथे भेटणारे कलाकार सुचवत होते. त्यामुळे नाटकांत काम मिळवण्याची तीची धडपड सुरू झाली. "जागो मोहन प्यारे" नाटकापासून तिची यशस्वी घोडदौड चालू झाली. ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘हे वय लग्नाचं’, ‘करून गेलो गाव’ अशा अनेक नाटकांमधे तिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली. तर ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दुर्वा’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘कन्यादान’, 'दिल्या घरी तू सुखी रहा', ‘शेजारी शेजारी-पक्के शेजारी’, 'आयुष्यमान भवं' अशा अनेक मालिकांमधूनही तिने निरनिराळ्या भूमिकांमधून रसिकांची वाहवा मिळवली.

Happy Birthday : नव्यापिढीचे विचार मांडू पाहणारी लेखिका

"रिस्क", "चांदी" अशा चित्रपटांमध्येही तिने कमाल अभिनयाने रसिकांचं प्रेम संपादन केलं. ‘बडी दूर से आये है’ या हिंदीमालिकेत तिला कशी भूमिका मिळाली याविषयी ती सांगते, ‘'या मालिकेसाठी माझ्याकडे नेहमी विचारणा व्हायची. या मालिकेचं ऑडिशन द्या म्हणून फोनही यायचे. पण' मी या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करत होते. हे लोक उगाचच मला ऑडिशनला बोलवणार, मराठी माणसाला हे काही काम देणार नाही. माझाही वेळ वाया जाईल असं मला नेहमी वाटायचं. मी नेहमी आज येते उद्या येते करून तिथे जाणं टाळायची. असं कित्येक महिने चालू होतं. अखेर तिथून शेवटचा फोन आला, आज ऑडिशनची शेवटची तारीख आहे. तुम्हाला यावंच लागेल. माझ्या मनात नसतानाही मी तिथे गेले. हिंदीत मला काही काम मिळणार नाही असंच वाटत होतं. पण त्यांनी ऑडिशन बघून मला लगेच सिलेक्ट केलं. तरी देखील माझा विश्वास बसत नव्हता. मालिकेचे प्रोमो शूट झाले आणि सार्वजनिक ठिकाणी त्याचे होर्डिग्स लावण्यात आले, तेव्हा कुठे जीवात जीव आला.’' म्हणजेच एखाद्या कलाकाराचं नशीब त्याला साथ देत असेल तर त्याच्या आयुष्यात काहिही घडू शकतं. पण रुपालीने आपल्या नशिबावर अवलंबून न रहाता जिद्द, कष्ट आणि अप्रतिम अभिनय या जोरावर या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. 

Happy Birthday: मराठी रसिकांशी गट्टी करणारा कलाकार

अभिनयाबरोबरच, एकापेक्षा एक-अप्सरा आली या नृत्याच्या कार्यक्रमात आपण नृत्यक्षेत्रातही काही कमी नाही आहोत, हे तिने सिद्ध करून दाखवलं. "बिग बॉस मराठी सिझन 2" गाजलेली रुपाली सध्या "गांधी हत्त्या आणि मी" या नाटकात गोपाळराव गोडसे यांच्या पत्नीची अप्रतिम भूमिका करत आहे. या नाटकाद्वारे तिच्यामधल्या सच्च्या अभिनेत्रीच्या अभिनयाचा एक नवा पैलू रसिकांसमोर उलगडला आणि रसिकांनाही तिची ही वेगळी भूमिका अतिशय आवडते आहे. अशा या गुणवान अष्टपैलू अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

#नाट्यकर्मीविजू