पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : मराठी प्रेक्षकांना घरातल्यासारखा वाटणारा 'सोनचाफा'

उमेश कामथ

मराठी नाट्यचित्रसृष्टीत देखण्या अभिनेत्यांची कधीच वानवा नव्हती. अगदी सूर्यकांत, अरुण सरनाईक, डॉ. घाणेकरांपासून ते आत्ताच्या गश्मीर महाजनीपर्यंत ही देखणी परंपरा अबाधित आहे. पण या साऱ्यांच्या देखणेपणात एक पुरुषी रांगडेपणाची झाक दिसते..... आणि अशातच अगदी आपल्यातला, बॉय नेक्स्ट डोअर वाटेल असा चिकनाचुपडा राजेश खन्ना टाईप एक अभिनेता येतो आणि मुलींनाच नाही तर मुलांनाही आपला, जवळचा वाटतो..... त्याचं नाव असतं उमेश कामत..... कोणतीही स्टायलोगिरी न करता, उगीचच उसन्या लकबी न वापरता हा अभिनेता स्टेजवर, स्क्रीनवर अगदी सहजपणे वावरतो आणि म्हणूनच तो घरातल्यासारखा वाटतो..... 

Happy Birthday : विनोदाची उत्तम जाण अन् टायमिंगवर कमालीची हुकूमत

उमेश कामतच्या अभिनयातली ही देखणी सहजता त्याला अभिनेता म्हणून वेगळी ठरवते. 'सोनचाफा' या नाटकापासून रंगभूमीवर आलेला हा रूपवान नट पुढे फक्त आपल्या देखणं असण्याच्या भांडवलावर नव्हे, तर सहज अभिनयाच्या बळावर इतकी मोठी झेप घेतो, ही खरंच थक्क करणारी गोष्ट आहे. रणांगण, स्वामी, नवा गडी नवं राज्य ते अगदी आत्ताच्या डोन्ट वरी बी हॅपी आणि दादा एक गुड न्यूज आहे पर्यंत हा कसदार अभिनेता रंगभूमीवर घरात वावरल्याच्या सहजतेनं वावरतो आणि तरीही उत्तम अभिनयाची दाद घेऊन जातो. त्याच्या रोल्समधली विविधताही त्याच्यातला चोखंदळ स्वभाव दाखवून देते. मराठीतला अमोल पालेकर म्हणावं इतक्या सहजतेनं तो प्रेक्षकांशी कनेक्ट होतो, म्हणूनच अ पेइंग घोस्ट, अजब लग्नाची गजब गोष्ट, बाळकडू, टाईम प्लीज, पुणे व्हाया बिहार अशा चित्रपटांमधून आणि आभाळमाया, असंभव, एका लग्नाची तिसरी गोष्ट अशा मालिकांमधून तो आपला ठसा उमटवत जातो. 

जंगजौहर : बांदल सेना आणि बाजीप्रभूंच्या अमर बलिदानाची गाथा

उमेश कामत..... मराठी चित्रपटनाट्यसृष्टीतलाच नव्हे, तर मराठी मध्यमवर्गीय घराघरातला आपला वाटणारा अभिनेता..... या तरुण, देखण्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.