पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : विनोदाची उत्तम जाण अन् टायमिंगवर कमालीची हुकूमत

भरत जाधव

नव्वदीचं दशक.... अशोक सराफ आणि लक्ष्याच्या जोडीनं मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातला होता.. तमाशा आणि कुटुंबपटात रुतलेल्या मराठी सिनेमाला अशोकमामा आणि लक्ष्या आपल्या खळाळत्या विनोदानं नवीन संजीवनी देत होते. मराठी रंगभूमीवरचे हे एकेकाळचे बिनीचे विनोदवीर सिनेमात व्यग्र झाल्यानं रंगभूमी पुन्हा गंभीर झाली होती..... आणि अशातच एक नाटक आलं, 'ऑल द बेस्ट'.... 'एक आंधळा एक मुका आणि एक बहिरा', अशा तीन मित्रांच्या एकत्र आयुष्यात आलेली एक मुलगी आणि नंतर होणाऱ्या गंमतीजंमती, असा भन्नाट प्लॉट असलेल्या या नाटकांनं रंगभूमीवर हैदोस घातला, हास्याचे धबधबे फुलवले आणि या नाटकात प्रमुख भूमिका करणारे तिघेहीजण एका रात्रीत स्टार झाले..... ते तिघे म्हणजे संजय नार्वेकर, अंकुश चौधरी आणि भरत जाधव.....

जंगजौहर : बांदल सेना आणि बाजीप्रभूंच्या अमर बलिदानाची गाथा

 येस.... आणि भरत जाधव.... डॉ. काशीनाथ घाणेकरांनी आपल्या नावामागे "आणि" लावून आपलं स्टेजवरचं 'सुपरस्टार' पद आयुष्यभर अढळ ठेवलं तर त्यानंतर भरत जाधव या हरहुन्नरी अभिनेत्यानं आपल्या अभिनयानं आणि रसिकांच्या प्रेमानं ते स्टारडम मिळवलं. विनोदाची उत्तम जाण, टायमिंगवर कमालीची हुकूमत आणि शब्दफेक अन मुद्राभिनयात दिसणारी अचाट विविधता यांमुळे हा गुणी अभिनेता लवकरच नाट्यरसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. 'ऑल द बेस्ट', 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदरपंत', 'आमच्यासारखे आम्हीच', 'पुन्हा सही रे सही', 'मोरूची मावशी', 'वन्स मोअर' असे विनोदाचे चौकार षटकार ठोकत असतानाच या अभिनेत्यानं अधांतर सारख्या नाटकातली गंभीर भूमिकाही लीलया पेलली. रंगभूमीप्रमाणेच 'जत्रा', 'शिक्षणाच्या आईचा घो', 'खबरदार', 'पछाडलेला', 'मुंबईचा डबेवाला', 'उलाढाल', 'मुक्काम पोस्ट लंडन', 'सरीवर सरी' अशा अनेक मराठी चित्रपटांत त्याने अविस्मरणीय भूमिका निभावल्यात.... 'एक टप्पा आऊट' या स्टँड अप कॉमेडीच्या कार्यक्रमाला हा जज म्हणून लाभणे ही रसिकांसाठी आणि स्पर्धकांसाठी एक पर्वणीच होती. अशा या सदाबहार गुणाढ्य अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मधून ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण