पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : तिन्ही माध्यमांचा सजग दिग्दर्शक

हेमंत देवधर

लेखकाने आपल्या लेखणीतून साकारलेल्या उत्तम कलाकृतीला पडद्यावर तितक्याच उत्कृष्टरित्या न्याय देणारा दिग्दर्शक म्हणजे हेमंत देवधर. सुरवातीच्या काळात ८५- ८६ साली 'कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे', या नाटकाची प्रकाश योजना आणि संगीताची बाजू त्याने नुसती सांभाळलीच नाही तर, त्यासाठी त्याने पारितोषिकही पटकावले. पुढे अनेक पारितोषिक विजेत्या एकांकिकांचा यशस्वी दिग्दर्शक म्हणून तो नावारुपाला आला.

प्रमोशनमधून वेळ काढत मेकअप मनच्या मुलाच्या लग्नात सलमानची उपस्थिती

 नंतर प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांच्या बरोबर 'आनंदवन भुवनी' या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्या नाटकात तो एक छोटीशी भुमिकाही करायचा. पुढे तो छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दिग्दर्शन करु लागला आणि त्याच्या प्रगतिचा आलेख दिवसेंदिवस उंचावताच गेला. 

दीपिकाला मागे टाकत आलिया ठरली आशियातील Sexiest Woman!

हमाल दे धमाल, कळत नकळत, एक होता विदुषक, मुक्ता अशा यशस्वी चित्रपटांना त्याने, कांचन नायक, पुरुषोत्तम बेर्डे, डॉ. जब्बार पटेल अशा दिग्गज दिग्दर्शकांना सहाय्य केलं. अशातच वर्तमान, भुमिका, एक हा असा धागा सुखाचा, सोनियाचा उंबरा, राजा शिवछत्रपती, कालाय तस्मै नम:, सुवासिनी, का रे दुरावा, जुळूनी येती रेशीमगाठी, देवयानी, इथेच टाका तंबू, नांदा सौख्यभरे अशा अनेक मालिकांचे आणि अरे देवा, आवाज कोणाचा, गुलदस्ता अशा यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन करुन फक्त रसिकांचीच नाही तर समिक्षकांचीही वाहवा मिळवली. अशा या तिन्ही माध्यमांच्या सजग दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.