पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: प्रसन्न व्यक्तिमत्वाची उत्तम अभिनेत्री

अभिनेत्री सारिका नवाथे

प्रसिद्ध लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना त्यांच्या 'जास्वंदी' नाटकासाठी सोनिया, म्हणजे नाटकातल्या नायिकेच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्री गवसत नव्हती. कारण, त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, "आम्हाला खास ‘आखुडशिंगी बहुगुणी’ नायिका हवी होती. अमुक वयाची, आकर्षक, उच्चभ्रू, उत्तम अभिनेत्री, तारखा मोकळ्या असणारी" पण या अटी काही जुळत नव्हत्या. 

Happy Birthday: नाटकाला दिवाणखान्याबाहेर आणणारा बंडखोर कलाकार

पण, एके दिवशी निमिषार्धात त्यांचा शोध संपला. डौलदार पावलं टाकीत 'ती' तालमीच्या हॉलमध्ये आली. मोठाले टपोरे डोळे, लांबसडक काळेभोर केस आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व, ती' होती सारिका निलाटकर (नवाथे) त्या मुळच्या नागपूरच्या. तिकडे बऱ्याच नाटकात काम केल्यावर त्या मुंबईत दाखल झाल्या. मुंबईतही "चाणक्य" नाटकातील त्यांच्या अप्रतिम अभिनयाने रसिकांची मनं जिंकून घेतली. 

Happy Birthday : तिन्ही माध्यमांचा सजग दिग्दर्शक

छोट्या पडद्यावर त्यांनी एण्ट्री घेतली ती 'हल्लागुल्ला'ची अँकर म्हणून. त्यांच्या करिअरला अवंतिका मधल्या मैथिली ने ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर चार दिवस सासूचे, वंश, सात जन्माची कहाणी, कुंकू टिकली आणि टॅटू या मालिका गाजवून त्या सध्या "मोलकरीण बाई" या मालिकेतून आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांना अंतर्मुख करत आहेत. मुन्नाभाई एसएससी, पहिली शेर दुसरी सव्वाशेर या चित्रपटातूनही त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांची दाद मिळवली. टपोऱ्या डोळ्यांच्या, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या, या उत्तम अभिनेत्रीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


#नाट्यकर्मीविजू