पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: संकटांनाही धीराने तोंड देणारी गुणी अभिनेत्री

अभिनेत्री आशा तारे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेने यंदाच्या वर्षी "प्रपंच लक्ष्मी" ह्या पुरस्काराने गौरवलेली गुणी अभिनेत्री "आशा तारे" हिचा आज वाढदिवस. रंगभूमीवर गेली अनेक वर्षे ती कार्यरत आहे. पुण्यातील व्यावसायिक रंगभूमी गाजवून नागपूरच्या "झाडीपट्टी" इथेही तिने आपल्या अप्रतिम अभिनयाने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. 

Happy Birthday: प्रसन्न व्यक्तिमत्वाची उत्तम अभिनेत्री

आपल्यावर आलेल्या संकटांना धीराने तोंड देऊन, ती जिद्दीने उभी राहिली आणि संसाराचा गाडा एकटीने खंबीरपणे ओढत राहिली. बेबंदशाही, नाथ हा माझा, स्वभावाला औषध नाही, लग्नाची बेडी, सौजन्याची ऐशी तैशी, चिरंजीव आईस, टूर टूर, ऑल लाईन क्लिअर, अशा अनेक नाटकांमधे आपल्या अप्रतिम अभिनयाने तिने स्वतःची अशी ओळख निर्माण केली. अशा उत्तम अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

#नाट्यकर्मीविजू

Happy Birthday: नाटकाला दिवाणखान्याबाहेर आणणारा बंडखोर कलाकार