पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : हसतमुख आणि विलक्षण ताकदीचा भन्नाट अभिनेता

अतुल परचुरे

'तरुण तुर्क म्हातारे अर्क' नाटकातला '(मु)कुंदा' नावाचा थोडासा स्त्रियांसारखा वागणारा, बोलणारा मुलगा आणि 'नातीगोती' नाटकातला 'बच्चू' हा मतीमंद मुलगा ही दोन अत्यंत वेगळी पात्र, परस्पर भिन्न स्वरूपाची. भिन्न स्वभावांची पात्र. पण ती दोन्ही पात्र आपल्या सहज सुंदर अभिनयाने जिवंत करून रसिकांना एक वेगळीच अनुभूती देणारा विलक्षण ताकदीचा भन्नाट अभिनेता "अतुल परचुरे" याचा आज वाढदिवस.

दीपिकाचे पार्टीवेअर लवकरच विक्रीसाठी होणार उपलब्ध

एखाद्या ख्यातनाम, दिग्गज, व्यक्तीच्या समोर त्यांचीच भूमिका साकार करायला मिळणं यासारखा विलोभनीय आनंद किंवा दृष्ट लागण्यासारखे भाग्य खूप कमी कलाकारांच्या वाट्याला येतं. हे भाग्य अतुलला लाभलं. पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा त्याने 'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. 'गेला माधव कुणीकडे', 'तुझे आहे तुजपाशी', 'भ्रमाचा भोपळा', 'बे दुणे पाच', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'डोळे मिटून उघड उघड', 'ए भाऊ डोकं नको खाऊ', 'वाह गुरू', 'आम्ही आणि आमचे बाप' अशा अनेक नाटकांमधे त्याने विविधरंगी भूमिका करून रसिकांच्या हृदयात हक्काचं आणि प्रेमाचं स्थान मिळवलं. 'नारबाची वाडी', 'हाय काय नाय काय', 'झकास', 'आम्ही सातपुते', 'नवरा माझा नवसाचा', 'पेइंग घोस्ट' अशा अनेक मराठी, तर, 'चोरोंकी बारात', 'जिंदगी 50-50', 'लव्ह रेसिपी', 'छोडो कल की बाते', 'खट्टा मिठा', 'ऑल द बेस्ट', 'डिटेक्टिव्ह नानी', 'ईट्स ब्रेकिंग न्यूज', 'पार्टनर', 'आवारापन', 'सलाम ए ईशक', 'कलयुग', 'यकीन', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'बेदर्दी', 'जुडवा 2' अशा अनेक हिंदी चित्रपटांमधूनही त्याने आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांना तणावमुक्त करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू उमटवलं.

टायगरनं घेतलं ८ बेडरुम्सचं आलिशान घर

"बिल्लू" चित्रपटातला चित्रीकरणाचा अफलातून प्रसंग अतुलच्या कमाल अभिनयाने रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. "जागो मोहन प्यारे" आणि "भागो मोहन प्यारे" या मालिकांद्वारे आता तो घराघरात पोहोचून जणूकाही रसिकांच्या घरातला महत्वाचा सदस्य बनला आहे इतकं प्रेम त्याला रसिकांकडून मिळत आहे. सध्या गाजत असलेल्या, "कापूस कोंड्याची गोष्ट" या नाटकातील त्याच्या अद्वितीय अभिनयाने रसिकांनी हे नाटक अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. अशा या हसतमुख, हरहुन्नरी, हजरजबाबी अभिनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...