पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयंती विशेष : संगीत रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारा नाटककार

विद्याधर गोखले

ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. ४ जानेवारी १९२४ रोजी अमरावती इथे त्यांचा जन्म झाला. अमरावती इथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे ते अध्यापक होते. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जायचे. यानंतर 'विद्याधर गोखले' यांनी, दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली आणि त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असतानाच ते नाटयलेखनही करत होते. त्यांनी एकूण १८ नाटकं लिहिली. त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर काही सामाजिक विषयांवर आधारित आहेत.

'गूड न्यूज'! परदेशातही चित्रपटाची बक्कळ कमाई

संगीत अमृत झाले जहराचे, इब्राहिमखान गारदी, संगीत चमकला ध्रुवाचा तारा, संगीत जय जय गौरीशंकर, जावयाचे बंड, संगीत पंडितराज जगन्नाथ, बरसते सूर्यातुन चंद्रिका, संगीत मदनाची मंजिरी, संगीत मंदारमाला, संगीत मेघमल्हार, रूपरंजनी, राणी रूपमती, साक्षीदार, सुंदरा मनामध्ये भरली, संगीत सुवर्णतुला, संगीत स्वरसम्राज्ञी, ह्या त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या नाटकांनी रसिकांची मनं जिंकली. त्यांची नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यांनी लिहिलेल्या पदांनीसुद्धा आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. 

'वाजवुया बँड बाजा'ची टीम श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला

रंगशारदा’ ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्थाही त्यांनी स्थापन केली. त्याच प्रमाणे नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. असे हे महाराष्ट्रातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व २६ सप्टेंबर १९९६ रोजी काळाच्या पडद्याआड गेलं. रसिकतेची साक्ष देणारी, विविधांगी आणि प्रतिभावान अशी लेखणी लाभलेल्या या  ज्येष्ठ नाटककाराला मानाचा मुजरा...