पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Birth Anniversary: मराठी रंगभूमीवरील पराक्रमी वाघ..मोहन वाघ

दिवंगत नाट्यनिर्माते मोहन वाघ (छायाचित्र-फेसबुक)

१० डिसेंबर १९९८..... सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या मातीत मराठी अभिमानाची रक्षा विसर्जित झाली, त्याच पानिपताच्या भूमीवर पुन्हा एकदा मराठे शाहीचे पराक्रमी सरदार एकत्र आले...…. हाती समशेर आणि मनात मराठयांच्या अतुल पराक्रमाला केलेला मुजरा लेऊन पानिपतावर उभ्या राहिलेल्या या वाघाचं नेतृत्व करणारा, त्यांना पानिपताच्या रणांगणावर उभं करणाराही एक वाघच होता..... मोहन वाघ..... 

Death Anniversary: विनय आपटे नावाच्या झंझावाताची गोष्ट

मराठी रंगभूमीवर केलेल्या दैदिप्यमान पराक्रमांनी मोहन वाघ आपलं नामाभिधान आयुष्यभर सार्थ करत राहिले..... मग ते "स्वामी"चा शतकमहोत्सव शनिवारवाड्यावर साजरा करणं असो किंवा गगनभेदी सारख्या नाटकाचा शुभारंभ सातासमुद्रापार लंडनच्या भूमीवर रुजवणं असो..... मोहन वाघांच्या रूपानं मराठी रंगजगताला एक कल्पक निर्माता लाभला होता..... वीस वर्षांच्या वृत्तपत्र फोटोग्राफीच्या कारकीर्दीनंतर नाट्यनिर्माता म्हणून रंगपटावर उतरणं म्हणजे नवा सारीपाट मांडून फासे टाकण्यासारखंच चॅलेंज.... पण अंगभूत धडाडीला नशिबाच्या फाशांचं भय नसतं आणि ज्याला ते भय नसतं, त्याच्याच बाजूनं फासे पडत जातात..... आपल्या "चंद्रलेखा" या नाट्यसंस्थेमार्फत ऑल दी बेस्ट, गगनभेदी, गारंबीचा बापू, गुड बाय डॉक्टर, घरात फुलला पारिजात, तरुण तुर्क, म्हातारे अर्क, ती फुलराणी, रणांगण, आम्ही जगतो बेफाम, रंग उमलत्या मनाचे, रमले मी, थ्री चिअर्स, वार्‍यावरची वरात, चाहुल अशा जवळपास एक्क्यांशी नाटकांची निर्मिती करून त्यांचे सोळा हजारांच्यावर प्रयोग वाघांनी रंगभूमीवर घडवून आणले..... 

Happy Birthday : सर्वोत्तम नाटकांची निर्मिती करणारा धडाडीचा निर्माता

३१ डिसेंबर १९७० ला "गारंबीचा बापू" या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी रात्री दोन वाजता मुंबईच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात सादर केला आणि तेव्हा स्वतःच पाडलेला हा पायंडा त्यांनी आयुष्यभर एखाद्या व्रतासारखा जपला..... नाटकाच्या माध्यमातून त्यांनी नाट्यक्षेत्रच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आपला प्रचंड मोठा मित्रपरिवार निर्माण केला..... कलावंताला तरी "हे विश्वचि माझे घर" यापलीकडे अजून काय हवं असतं..... पण या अवलिया कलावंताजवळ फक्त नाट्यनिर्मिती नव्हे तर फोटोग्राफी, दिग्दर्शन, लेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य असे नानाविध गुण होते..... या प्रत्येक गुणाची मोहोर त्यांच्या निर्मितीत अगदी चोख उतरलेली जाणवते..... ७ डिसेंबर १९२९ ला जन्माला आलेल्या या नाट्ययोग्यानं २४ मार्च २०१० या दिवशी जगाच्या रंगपटावरून दुःखद एक्झिट घेतली..... पण आजही पानिपताच्या मातीतून उगवणारे अंकुर बोलू लागले तर तेही सांगतील, "इथल्या मातीत एका वाघानं हजारो मराठी वाघांच्या पराक्रमाला नाट्यपुष्पांजली अर्पिली होती...."अशा या मित्रांसाठी 'मोहन' आणि मस्तीखोरांसाठी 'वाघ' असलेल्या अवलियाला मानाचा मुजरा

#नाट्यकर्मीविजू

Happy Birthday : हसतमुख आणि विलक्षण ताकदीचा भन्नाट अभिनेता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Birth Anniversary of late Marathi theatre actor and producer Mohan Wagh blog written by vijay patwardhan