पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या तारखेला प्रदर्शित होणार मोदींचा बायोपिक

PM Modi Biopic

गेल्या कित्येक महिन्यांपासून वादात सापडलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' या महिन्याअखेर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट आधी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता मात्र निवडणूक आयोगानं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी  आणली होती. आता हा चित्रपट लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रदर्शित होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामान्य माणूस ते देशाचा पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. विवेकव्यतिरिक्त अन्य  बॉलिवूड कलाकारांची फौजही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची  तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट आधी १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. ११ एप्रिलला  देशात  मतदानाला सुरूवात झाली होती. या चित्रपटाचा वापर भाजप प्रचारासाठी करत असल्याचा आरोप यापूर्वी काँग्रेस आणि अनेक विरोधी पक्षांनी केला होता. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस तथा अनेक विरोध पक्षांनी याची तक्रारही केली.

यासंबधीची याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली होती. सुप्रिम कोर्टानं चित्रपट पाहून निवडणूक आयोगाला अहवाल  देण्यास सांगितला होता. या चित्रपटात जाणीवपूर्वक एका नेत्याच्या प्रतिमेचा उदात्तीकरण  करण्यात आलंय तर काहींच्या प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला होता. बऱ्याच वादविवादानंतर अखेर हा चित्रपट २४ मेला प्रदर्शित होणार आहे.