पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस अश्लील कार्यक्रम, तातडीने बंद करण्याची मागणी

सलमान खान

बिग बॉस कार्यक्रम अश्लील असून, कुटुंबासोबत बसून हा कार्यक्रम बघणे शक्य नाही. त्यामुळे तो तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी गाझियाबादमधील भाजपचे आमदार नंदकिशोर गुज्जर यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठविले आहे.

'आईनं बळजबरीनं पाठवलं होतं चित्रपटसृष्टीत'

आपल्या पत्रामध्ये नंदकिशोर गुज्जर यांनी लिहिले आहे की, बिग बॉस हा कार्यक्रम देशाच्या संस्कृतीविरोधात आहे. यामधील काही दृश्य़े ही पूर्णपणे आक्षेपार्ह आणि अश्लील आहेत. वेगवेगळ्या समाजातून आलेल्या जोड्यांना एकमेकांसोबत झोपण्यास सांगण्यात येते. अशा पद्धतीची कृती कधीही स्वीकारार्ह नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

'चंपा'ला शरद पवारांशिवाय काहीच दिसत नाहीः अजित पवार

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला परत एकदा गतवैभव मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे देशाचे नाव बदनाम केले जात आहे, असेही त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. दूरचित्रवाहिन्यांवर दाखविण्यात येणारे कार्यक्रमही सेन्सॉर केले जावेत. त्यामुळे भविष्यात अशा स्वरुपाचे कार्यक्रम प्रदर्शित होणार नाहीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.