पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वीणा -शिवची लव्हस्टोरी घराबाहेर पडल्यानंतर सुध्दा पहायला मिळेल'

शिव ठाकरे आणि वीणा जगताप

बिग बॉस मराठीच्या घरातील लव्ह बर्ड्स म्हणून वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांना ओळखले जाते. त्यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. दोघांचे घरातील वागणे, बोलणे, प्रेम करणे, एकमेकांची काळजी घेणे आणि रुसवे-फुगवे आपण सर्वांनी पाहिले आहे. दोघे एकमेकांना सध्या पसंत करतात मात्र बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर काय होईल हे कोणाला माहिती नाही. दरम्यान, वीणा आणि शिवची लव्हस्टोरी घराबाहेर आल्यानंतर सुध्दा पहायला मिळेल, असे मत बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला माधव देवचके याने व्यक्त केले आहे. 

बिग बॉसच्या घरात किशोरीताईंवर खूप इमोशनल अत्याचार झाले'

विणा आणि शिव हे खूप चांगले मित्र आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि आता ते एकमेकांना आवडू लागले आहेत. दोघे ही बिग बॉसच्या घरामध्ये चांगला गेम खेळत आहे. गेम खेळता-खेळता जे जवळ आले आहेत. दोघांचे एकमेकांवर प्रेम असले तरी ते बाजूला ठेवून वैयक्तीक गेम खेळत आहेत. त्यांना घराबाहेर यायला बराच वेळ आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांनी फक्त खेळावर फोकस केला पाहिजे. त्यांची लव्हस्टोरी घराबाहेर आल्यावर देखील सर्वांना पहायला मिळेत, असे मला वाटत असल्याचे माधवने सांगितले. 

बाळाच्या नावासह अर्जुन रामपालने इन्स्टावर गोंडस फोटो केला शेअर

दरम्यान, शिव हा खूप साधा मुलगा आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टी स्पष्ट असतात. 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' असे तो वागतो. आतापर्यंत तो तसाच वागत आला आहे. तो सर्वांचे म्हणणे ऐकतो मात्र त्याच्या मनाला जे पटते तेच तो करतो. कोणाशी कसे वागावे हे त्याला कळते. लोकांना तो खूप आवडतो. त्यामुळेच तो आतापर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये असल्याचे मत माधवने व्यक्त केले आहे. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या टॉप ५ मध्ये शिव असेल असे त्याने सांगितले. 

बिग बॉस मराठी सिझन २ - माधव देवचके घराबाहेर