पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉस १३'च्या विजेतेपदावर सिद्धार्थ शुक्लाने कोरले नाव

सिध्दार्थ शुक्ला आणि सलमान खान

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस १३' च्या विजेतेपदावर सिध्दार्थ शुक्लाने नाव कोरले. शनिवारी झालेल्या फिनालेमध्ये सर्वांना मागे टाकत सिध्दार्थने बाजी मारली. तर आसिम रियाज फर्स्ट रनर अप ठरला आहे. अभिनेता सलमान खानने 'बिग बॉस'च्या १३चा विजेता सिध्दार्थ शुक्लाच्या नावाची घोषणा केली.

हे आहेत नववर्षांत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

बिग बॉस १३ वे पर्व अनेक मार्गांनी खास ठरले आहे.  या वेळेचे पर्व मागील पर्वापेक्षा खूप वेळ चालले. १४० दिवस बिग बॉसचे १३ वे पर्व चालले.  स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्याची स्पर्धा पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळाली. प्रत्येकाने आपापल्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. अखेर सिद्धार्थ शुक्लानेच ट्रॉफी जिंकत बिग बॉस १३ व्या पर्वाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

'हम्मा हम्मा' गाणं सोडलं तर कोणतंही रीमिक्स आवडलं नाही- रहमान

बिग बॉसच्या १३ व्या पर्वात सिद्धार्थ शुक्लाने असीम रियाझचा पराभव केला. या पर्वात काश्मीर मॉडेल असीम रियाज दुसर्‍या क्रमांकावर होता. सिध्दार्थ शुक्ला, असीम रियाझ, रश्मी देसाई, शहनाज गिल, पारस छाब्रा आणि आरती सिंग या सहा स्पर्धकांनी 'बिग बॉस १३’च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. यावेळी बिग बॉस १३ खूप चांगला चालला. हा शो बर्‍याच आठवड्यांपर्यंत टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला.

व्हॅलेंटाइन डेमुळे 'लव्ह आज कल'ची तुफान कमाई, मात्र पुढचं काय?