पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस वाद : सलमानच्या घराभोवती सुरक्षा वाढवली

सलमान खान

बिग बॉसचा १३ वा सिझन मोठ्या प्रमाणात वादात सापडला आहे. हा शो बंद करण्याची मागणी होत आहे. अशातच शुक्रवारी करणी सेनेसह अनेक संस्थांनी सलमानच्या वांद्रे इथल्या घरी निदर्शनं केली. सलमान  हा बिग बॉस १३ चं सुत्रसंचालन करत आहे. 

अनेक संस्थांनी सलमानच्या घरासमोर त्याच्याविरोधात आंदोलन केलं.  यात काही महिलांचाही समावेश होता. यातल्या काही लोकांना ताब्यात घेतलं आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त परमजित दहिया यांनी दिली. 

आयुष्मानचा 'बाला' पुन्हा वादात, स्वामित्व हक्क भंगाचा तिसरा आरोप

त्यानंतर सलमानच्या घरासमोर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ३० पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा सलमानच्या घरासमोर  तैनात करण्यात आला आहे. गाझियाबादमधील भाजपचे आमदार नंदकिशोर गुज्जर यांनी  नुकतंच माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून हा शो बंद करण्याची मागणी केली होती. 

दीपिकाच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत विक्री, संस्थेला करणार मदत

  बिग बॉस कार्यक्रम अश्लील असून, कुटुंबासोबत बसून हा कार्यक्रम बघणे शक्य नाही. हा कार्यक्रम देशाच्या संस्कृतीविरोधात आहे. यामधील काही दृश्य़े ही पूर्णपणे आक्षेपार्ह आणि अश्लील आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला परत एकदा गतवैभव मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे देशाचे नाव बदनाम केले जात आहे, असं गुज्जर यांनी आपल्या पत्रात लिहिले होते.