पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या कोयना मित्राचा सलमानवर आरोप

कोयना मित्रा

गेल्या काही दिवसांपासून  वादात सापडलेल्या बिग बॉसच्या घरातून अभिनेत्री कोयना मित्रा बाहेर पडली आहे. बिग बॉसच्या विजेती पदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी कोयना चटकन शोमधून बाद झाली हा तिच्या आणि तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. 

घरातून बाहेर पडल्यानंतर तिनं सलमानवर चुकीच्या लोकांना पाठीशी घातल्याचा आरोप केला आहे. सलमानचं तिच्याप्रती वागणं अयोग्य असल्याचं तिनं स्पॉट बॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

दत्तक घेतलेल्या मुलीचा सनीनं थाटामाटात केला वाढदिवस साजरा

सलमानचं माझ्याप्रती वागणं थोडं वेगळंच होतं. ते प्रेक्षकांच्याही लक्षात आलं असेल. सलमाननं या शोमध्ये चुकीच्या स्पर्धकांची पाठराखण केली आहे. तो चुकीच्या लोकांना पाठीशी घालतो. त्याचं वागणं त्याला योग्य वाटतंय, असा  आरोप कोयनानं केला आहे. 

सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमधल्या चित्रपटात काम केलेली कोयना काम मिळेनासं झाल्यापासून बॉलिवूडपासून दूर गेली. त्यानंतर बिग बॉसमध्ये ती दिसली. या शोची ती प्रबळ दावेदार मानली जात होती, मात्र पहिल्याच काही दिवसांत घराबाहेर पडल्यानं कोयनाचं बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न तूर्त भंगलं. 

कपिल होणार बाबा, 'बेबी शॉवर'चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल