पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस १३ 'या' दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बॉस १३

प्रसिध्द रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस हिंदीचे १३ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो कधी सुरु होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मात्र प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण या शोच्या प्रसारणाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २९ सप्टेंबरपासून हा शो सुरु होणार आहे. याचा एक प्रोमो प्रसिध्द करत याची घोषणा करण्यात आली आहे. बिग बॉस हिंदीच्या १३ व्या पर्वात फक्त सेलिब्रिटीज पहायला मिळणार आहेत.

ह्युस्टनमध्ये मोदींसाठी आयोजित कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प येणार

बिग बॉस १३  येत्या २९ सप्टेंबरला रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. या शोच्या माध्यमातून सलमान खान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसचा १३ सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० ते ११.३० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर शनिवार आणि रविवार विकेंडचा वार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.  बिग बॉसचा १२ प्राइम टाइममध्ये म्हणजे रात्री ९ ते १० वाजता प्रसारित झाला होता. बिग बॉसचे १२ वे पर्व अत्रिनेत्री दीपिका कक्कर हिने जिंकले होते.

जैश-ए-मोहम्मदने दिली रेल्वे स्टेशन आणि मंदिर उडवण्याची धमकी

बिग बॉस १३ चे शूटिंग लोणावळ्याऐवजी गोरेगावला होणार आहे. या शोमध्ये हॉरर थीम असणार आहे. तसंच, बिग बॉस १३ मध्ये अंकिता लोखंडे, पवित्रा पुनिया, मेघना मलिक, आरती सिंह, देबीना भट्टाचार्य, करण पटेल, शिवीन नारंग, सिद्धार्थ शुक्ल, दलजीत कौर, महिका शर्मा या स्पर्धकांच्या नावांची चर्चा सुरु आहे. 

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा: उध्दव ठाकरे