पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BB 13 : अमीषा पटेल बिग बॉसच्या घराची नवी 'मालकीण'

बिग बॉस १३

बिग बॉस हिंदीच्या तेराव्या सीझनला सुरूवात झाली आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदा नवं काय याची  उत्सुकता प्रेक्षकांना होती. या सीझनमध्ये सलमानसोबत अभिनेत्रीदेखील शो होस्ट करणार अशा चर्चा होत्या. अखेर यावरून पडदा उठला आहे. 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून चर्चेत आलेली आणि सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असलेली अभिनेत्री अमीषा पटेल बिग बॉसमध्ये 'मालकिणी'च्या भूमिकेत असेल. 

देवीची रुपं साकारण्यासाठी तेजस्विनीनं घेतली कित्येक दिवसांची मेहनत

अमीषा बिग बॉसच्या घरात येत- जात राहणार आहे.  प्रत्येक स्पर्धकावर मालकीण अमीषाची करडी नजर असणार आहे. घरातल्या सदस्यांशी संपर्क साधणं, त्यांना टास्क देण्याची जबाबदारी अमिषाची असणार आहे. या घरात आलेल्या प्रत्येक स्पर्धकाबद्दल मी अभ्यास केला आहे. मला त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट माहिती आहे असंही अमीषा म्हणाली. 

'दयाबेन' करणार 'तारक मेहता...'मध्ये कमबॅक, निर्माते सकारात्मक

घरातील अनेक सदस्य हे सिंगल आहेत मात्र घरातून बाहेर पडताना नक्कीच त्यातल्या अनेकांना जोडीदार मिळाला असेल असंही अमीषा मिश्किलपणे म्हणाली.  अमीषाला बिग बॉसनं घरची मालकीण ठरवलं आहे, त्यामुळे आता ही नवी मालकीण घरच्या सदस्यांसोबत कशी वागणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bigg Boss 13 came up with a new surprise in Ameesha Patel Salman introduced her as maalkin of the house