पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Bigg Boss फेम दीपक ठाकूर विरोधात जसलीन मथारूची पोलिसात तक्रार

जसलीन मथारू

बिग बॉस या हिंदी रिअॅलिटी शोमधून चर्चेत आलेल्या जसलीन मथारूनं याच शोमधील स्पर्धेक  दीपक ठाकूरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  'बिहारी बाबू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपकनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये  त्याच्या भावानं  जसलीनवर टिप्पणी केली होती.  जसलीनला ही  टिप्पणी खटकली. जसलीनच्या चाहत्यांनीही या  व्हिडिओवर आक्षेप घेतला. त्यानंतर जसलीननं दीपकविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. 

माझा कंगनालाच पाठिंबा, हृतिकच्या बहिणीची कबुली

दीपक ठाकूरनं त्यानंतर जाहीर माफीही मागीतली. मी ज्यांना दुखावलं त्या सर्वांची मी माफी मागतो. मी महिलावर्गाचा आदर करतो. मला जसलीनप्रतीही आदर आहे. माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला वाईट वाटलं म्हणूनच मी तुमची माफी मागतो. माझा हेतू कोणालाही दुखवायचा नव्हता  असं दीपकनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

तसंच हा व्हिडिओ खटकला होता तर फोन करून सांगायचं होतं यासाठी पोलिसात तक्रार करण्याची काय गरज?  जसलीननं उचललेलं हे पाऊल म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं दीपकनं म्हटलं आहे. जसलीन मथारू आणि  दीपक ठाकूर हे दोघंही बिग बॉसच्या १२ व्या सिझनमध्ये दिसले होते.