पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉस'च्या घराबाहेर जाण्यासाठी एकाच ग्रुपमधले सर्व सदस्य नॉमिनेट

बिग बॉस मराठी २

बिग बॉसच्या घरात नवा आठवडा सुरू झाला आहे. मैथिली जावकर, दिगंबर नाईक, विद्याधर जोशी हे तीन सदस्य घरातून बाहेर पडले आहेत. शिवानी सुर्वे हिनं हा खेळ अर्ध्यावर सोडला आहे, तर घरात तिच्याजागी हिना पांचाळची एण्ट्री झाली आहे. आता या आठवड्यात घराबाहेर कोणता खेळाडू पडतो याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. घरातील सदस्यांनी पाच जणांना नॉमिनेट केलं आहे. विशेष म्हणजे घरातील 'केवीआर' ग्रुपमधले चार सदस्य घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. 

अब्रूनुकसानीच्या खटल्याप्रकरणी कंगना- रंगोलीला न्यायालयानं बजावले समन्स

 या आठवड्यात घरातून बाहेर पडण्यासाठी वीणा जगताप, पराग कान्हेरे, हीना पांचाळ, किशोरी शहाणे आणि रुपाली भोसलेला नॉमिनेट करण्यात आलं आहे. पराग आणि किशोरी हे गेल्या आठवड्यातही नॉमिनेट झाले  होते. पराग गेल्या आठवड्यात डेंजर झोनमध्येही होता. मात्र नशीबानं त्याला साथ दिली आणि तो वाचला. आता या आठवड्यातही परागला नशीबाची साथ मिळेन का हे पाहण्यासारखं ठरेन. 

'कबीर सिंह'ची बॉक्स ऑफिसवर सेंच्युरी

घरात पहिल्या काही दिवसांतच किशोरी, रुपाली, पराग, विणाचा ग्रुप झाला होता. मात्र आता  ग्रुपमधले सगळेच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर पडेल? प्रेक्षकांची मते कोणाला वाचवतील? हे बघणे रंजक ठरणार आहे.