पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाप्पांनी सांगितलं नेहालाच सेफ करण्यामागचं कारण

नेहा विद्याधर

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना विद्याधर जोशी यांना या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी एक विशेष अधिकार दिला, ज्यामध्ये त्यांना घरातील एका सदस्याला सेफ आणि अनसेफ करायचे होते. विद्याधर म्हणजेच बाप्पा यांनी एका सदस्याला अनसेफ करण्यास नकार दिला. मात्र जाता जाता त्यांनी नेहा शितोळेला सेफ केलं. 

बिग बॉस मराठी २ : शिव्या देण्यापासून बिचुकलेंना थांबवलं नाही कारण...

बाप्पांनी नेहालाच का सेफ केलं याचं आश्चर्य प्रेक्षकांसह घरातील सदस्यांनाही होतं. शिव माझा सर्वात लाडका व्यक्ती आहे असं कौतुकानं सांगणाऱ्या बाप्पांनी शिवला का सेफ केलं नाही हा प्रश्न सदस्यांसोबत चाहत्यांनाही होता. घरातून बाहेर पडल्यानंतर विद्याधर जोशी यांनी कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून चाहत्यांशी लाईव्ह चॅटद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

दुप्पट किंमत मोजून तमन्नानं घेतलं आलिशान घर

नेहाच्या स्वभावात काही दोष आहेत. मात्र त्या दोषाकडे दुर्लक्ष केलं तर ती उत्तम खेळते. हा खेळ खेळण्यासाठी लागणारी  उत्तम बुद्धी आणि मानसिक आणि शारीरिक ताकद नेहामध्ये आहे. स्वभावामुळे घरातले सदस्य तिच्यावर चिडतात मात्र ती स्पर्धक म्हणून उत्तम आहे म्हणूनच मी तिला सेफ केलं असं विद्याधर म्हणाले.