पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हे निकष वापरूनच सदस्यांना नॉमिनेट करा, बिग बॉसचा आदेश

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या घरातून दर आठवड्याला एक सदस्य घराबाहेर पडतो. मात्र गेल्या आठवड्यात एलिमनेश राऊंड पार पडला नाही यामुळे कोणताही सदस्य एलिमनेट झाला नाही. एलिमनेशनची  टांगती तलवार सदस्यांच्या डोक्यावरून टळली असली तरी या आठवड्यात मात्र एलिमनेशन होणार आहे. आता घरातून बाहेर पडण्यासाठी या आठवड्यात कोणता सदस्य नॉमिनेट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

'वयानं लहान जोडीदार निवडणाऱ्या स्त्रिला म्हातारी म्हणून हिणवतात'

नव्या आठवड्यात घरात नवं नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. यानुसार घरामधील प्रत्येक सदस्याला घरात राहण्यासाठी अपात्र असणाऱ्या दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. कार्य पूर्ण करण्यासाठी बिग बॉस यांनी काही निकष देखील सदस्यांना सांगितले आहेत. 

रवीना टंडननं झायरा वसीमला सुनावले खडे बोल

सदस्यांची निराशाजनक कामगिरी,  खेळ समजण्यासाठी बौद्धिकचातुर्य नसणे, कार्यात आपली भूमिका नीट न बजावणे, या खेळात डावपेच आखण्याची क्षमता नसणे यांसारखे निकष वापरून सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे असा आदेश बिग बॉसनं घरातील  सदस्यांना दिला आहे. तेव्हा या आठवड्यात घराबाहेर पडण्यासाठी कोणते सदस्य नॉमिनेट होतात हे पाहण्यासारखं  ठरणार आहे.