पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : घरातील सदस्यांच्या पाप पुण्याचा होणार हिशेब

बिग बॉस मराठी

नव्या आठवड्याला सुरूवात झाल्यानं आता घरात नवं साप्ताहिक कार्य रंगणार आहे. सोमवारी बिग बॉसच्या घरात विजयाचा मनोरा हे साप्ताहिक कार्य रंगलं. या कार्यात शिवनं बाजी मारत दुसऱ्यांदा कॅप्टनसीचा मान मिळला. 

बिग बॉस मराठी २ : अभिजित बिचुकलेंविरोधातील तक्रार मागे

नव्या भागात हिशेब पाप पुण्याचा हे  कार्य रंगणार आहे. या आठवड्यातील बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे भवितव्य हे त्यांच्या नशिबावर आणि त्यांच्या बऱ्या वाईट कामांवर अवलंबून असणार आहे.  आजच्या भागात बिग बॉस सदस्यांवर “हिशेब पाप पुण्याचा” हे नॉमिनेशन कार्य सोपवणार आहेत. घरातील सदस्यांनी आजवर केलेल्या चुका, चांगली काम यांना तपासण्यासाठी हे कार्य देण्यात आलं आहे. 

टायगर- दिशाचं ब्रेकअप झाल्याच्या बॉलिवूडमध्ये चर्चा

या कार्यात घरातील कोणत्या सदस्यांना नरकात पाठवून नॉमिनेट करायचं आणि कोणत्या सदस्यांना स्वर्गात पाठवून सेफ करायचं हे ठरणार आहे. यासाठी घरातील  सदस्यांपैकी एक निर्णय कार्यप्रमुख आणि त्यांचे दोन सल्लागार असणार आहेत. आता कार्यप्रमुख आणि सल्लागार कोणाला वाचवणार आणि कोणाला नॉमिनेट करणार हे बघणे रंजक असणार आहे.