पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : शिव्या देण्यापासून बिचुकलेंना थांबवलं नाही कारण...

अभिजित बिचुकले

कवी मनाचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिजित बिचुकलेंनी गेल्या आठवड्यात बिग बॉसचं घर अक्षरश: दणाणून सोडलं. घरातील सदस्य रुपाली भोसलेला बिचुकलेंनी शिवीगाळ केली. एका टास्कदरम्यानं रुपाली आणि बिचुकले यांच्यामध्ये कडाक्याचं  भांडण झालं. अखेर भडकलेल्या बिचुकलेंनी रुपालीला शिवीगाळ केली. यावरून चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात बिचुकलेंवर नाराजी व्यक्त केली. मात्र घरातील ज्येष्ठ या नात्यानं विद्याधर जोशी यांनी बिचुकलेंना का अडवलं नाही असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत. 

दुप्पट किंमत मोजून तमन्नानं घेतलं आलिशान घर

बिग बॉस मराठी २ च्या घरातून विद्याधर जोशी घरातून  बाहेर पडले आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर विद्याधर जोशी यांनी कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून चाहत्यांशी लाईव्ह चॅटद्वारे संवाद साधला. यावेळी शिवीगाळ करणाऱ्या बिचुकलेंना का अडवलं नाही  असा प्रश्न चाहत्यांनी विचारला. घरातून संयमी आणि समजूतदार सदस्य म्हणून  विद्याधर ओळखले जायचे. मात्र यावेळी विद्याधर म्हणजेच बाप्पा यांनी कानावर हात ठेवणं सोयीचं समजलं. आपण त्यावेळी अशी  भूमिका का घेतली याचं स्पष्टीकरण बाप्पा यांनी घरातून बाहेर पडल्यानंतर दिलं.

'बिग बॉस 'मध्ये परतण्याबद्दल शिवानीचा खुलासा

बिचुकले शिवीगाळ करतात किंवा महिलांचा अनादर करतात ही बाब खरी आहे. मात्र घरातील याच महिला सदस्य दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी नीट बोलतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांना जेवू घालतात. जर एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करत असेन आणि दुसऱ्या दिवशी घरातील महिला सदस्यच त्यांच्याशी नीट वागत असतील तर माझ्या बोलण्याला अर्थ काय? मला ते वागणं खटकलं म्हणूनच मी मध्ये पडलो नाही असं म्हणत बाप्पा यांनी वादातून अलिप्त राहण्य़ाचं कारण सांगितलं.